
भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सरकार आणि आपल्या विरोधात सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरुणांवर त्यांनी भाषणातून चांगलाच निशाणा साधला आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवें
.
बबनराव लोणीकर म्हणाले, कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे. जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मागील दोन दिवसांपूर्वीच भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना इशारा देणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जालना तालुक्यातील बोरगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी भाषणात विधानसभेत लीड नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत लोणीकरांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या. पाच वर्षांचे बलुतं, एक फुली द्या नाहीतर नका देऊ. पण तुम्ही मला नाही दिलं तरी पाच-दहा कोटी मिळतात हे डोक्यातून काढून टाका, असा टोला त्यांनी गावकऱ्यांना लगावला. तसेच, मी एक, दोन, तीन वेळा पाहिलं, त्यानंतर गावावर फुली मारील, असा थेट इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.