digital products downloads

राज्यातील पोलिस दलात मोठी खांदेपालट: 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईत 5 अधिकाऱ्यांची पोलिस उपायुक्त पदावर पदोन्नती – Maharashtra News

राज्यातील पोलिस दलात मोठी खांदेपालट:  51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईत 5 अधिकाऱ्यांची पोलिस उपायुक्त पदावर पदोन्नती – Maharashtra News

राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच आहे. 15 दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर, 8 दिवसांपूर्वी 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता आज एकाचवेळी तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्य

.

पोलिस दलातील या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे, तर काहींची डिमोशनसह बदली झाली आहे. बदल्यांच्या या आदेशानुसार, पुणे शहरातील शस्त्र निरीक्षक शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली राज्य राखीव पोलिस बल, पुणे (गट क्रमांक 1) येथे समादेशकपदी करण्यात आली आहे. तर, महेंद्र पंडित यांची स्तंभ 2 मधून स्तंभ 3 मध्ये बदली झाली असून, बृहन्मुंबई पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत पाच आयपीएस अधिकाऱ्यांची पोलिस उपायुक्त पदावर पदोन्नती झाली असून, त्यामध्ये तुषार पाटील, विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांचा समावेश आहे.पुण्यातील वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची देखील बदली करण्यात आली असून, स्मार्तना पाटील यांना पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे नियुक्ती देण्यात आली आहे. सरकारच्या नव्या बदली आदेशान्वये पुण्यामध्ये तीन नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बदली झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची यादी

राज्यातील पोलिस दलात मोठी खांदेपालट: 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईत 5 अधिकाऱ्यांची पोलिस उपायुक्त पदावर पदोन्नती - Maharashtra News
राज्यातील पोलिस दलात मोठी खांदेपालट: 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईत 5 अधिकाऱ्यांची पोलिस उपायुक्त पदावर पदोन्नती - Maharashtra News
राज्यातील पोलिस दलात मोठी खांदेपालट: 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईत 5 अधिकाऱ्यांची पोलिस उपायुक्त पदावर पदोन्नती - Maharashtra News

15 दिवसांपूर्वीच 8 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, राज्य सरकारने गेल्या 15 दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर, गेल्या आठवड्यात देखील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यात पराग सोमन यांची मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून वर्ध्याच्या जिल्हा परिषद सीईओपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची बदली यशदा, पुणे येथे उपसंचालकपदी झाली आहे. त्यानंतर, आता 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp