
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : मला उद्धव ठाकरे यांना ऐवढच सांगायचं आहे की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही. कारण हिंदी सक्ती नाहीच. मराठी सक्ती आहे. हिंदी पर्याय असल्याचं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आणि मनसेकडून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. ठाकरे गटाने तीन हजार 116 शाळांमध्ये जाऊन जनजागृती केल्याणाचा निर्णय देखील घेतला आहे. त्यासाठी सर्व शाळांना तशी पत्र देखील पाठवण्यात येणार आहेत.
प्रथमच 5 वर्षात 26 टक्के वीजदर कमी होणार
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या पाच वर्षांमध्ये दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय हा राज्य सरकार आणि महावितरणने घेतला आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये विजेचे दर 9 टक्के ते 10 टक्के वाढले होते. मात्र, हे दर आपण सध्या कमी करतो आहोत. आजचा दर हा 10.88 रुपये इतका आहे. हाच दर पाचवर्षांमध्ये वाढण्याऐवजी कमी करून तो 9.97 रुपयांपर्यंत येणार आहे.
बळीराजाला दिवस-रात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चात बचत होणार आहे. आम्ही आमच्या जाहिरनाम्यात सांगितल्या प्रमाणे विजेचे दर कमी केले आहेत.
‘बबनरावांना समज देण्यात येईल’
बबनराव लोणीकरांचा विधान एकदम चुकीचं आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून हे विधान केलं असेल तरही अशा प्रकारचे विधान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा सांगतात की मी देशाचा प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकर यांनी जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीच आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. तशी समज बबनराव लोणीकर यांना देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.