
विदर्भाची पंढरी, भगवान श्रीकृष्णाचे सासर तसेच माता रुक्मिणीचे व पंच सतीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथील वर्धा नदीला तब्बल २११ मीटरची साडी अर्पण सोहळा शुक्रवारी (दि.२७) पार पडला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून ही अखंड
.
या सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणी रथयात्रा, टाळ मृदंगाचा गजर व तिरंगा रॅली काढून नगर प्रदक्षिणा, एक पेड के नाम (वृक्षारोपण) असे विविध कार्यक्रम पार पडले. अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या संकल्पनेतून हा सोहळा घेण्यात आला.
या वेळी आ. राजेश वानखडे, आ. प्रताप अडसड, आ. प्रवीण तायडे, किरण पातुरकर, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, दादाराव केचे, शेखर भोयर, रविराज देशमुख, राज राजेश्वर माऊली सरकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कौंडण्यपूर या तीर्थक्षेत्राला प्राचीन इतिहास असून श्री रामचंद्राची आजी, राजा दशरथाची आई इंदुमती, राजा भीमक कन्या माता रुक्मिणी, नलराजाची महाराणी, केशिनी या पंच सतीचे माहेर आहे. तसेच नाथ संप्रदायातील चौरंगीनाथ या सर्वांचे जन्मस्थान कौंडण्यपूरच आहे. नाथाची समाधी सुद्धा येथेच आहे. वशिष्ठा (वरदा आजची वर्धा) नदीच्या पात्रात पुंडलिक नावाचे कुंड आहे. याच कुंडातून संतश्रेष्ठ सदाराम महाराजांना पांडुरंगाची मूर्ती प्राप्त झाली आणि तिची प्रतिष्ठापना केली. आज कौंडण्यपूर येथे भव्य मंदिर उभे आहे. तब्बल ४३१ वर्षांपासून कौंडण्यपूर ते पंढरपूर पायी पालखी सुद्धा आषाढी सोहळ्यासाठी या ठिकाणाहून जाते.
तत्पूर्वी, सर्वप्रथम सकाळी १० वाजता पासूनच श्री विठ्ठल रुक्मिणी रथयात्रेचे पूजन व टाळ, मृदंग व तिरंगा रॅलीमध्ये नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजन व आरती आणि त्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या व अप्पर वर्धा तसेच लोअर वर्धा प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंजीवनी ठरलेल्या वर्धा नदीला मान्यवरांच्या हस्ते २११ मीटरची साडी, चोळी अर्पण केली. या वेळी शंभराहून अधिक महिला भजनी मंडळ सहभागी झाल्या होत्या.
रुक्मिणी मातेचा आशीर्वाद घेऊन जनतेची सेवा करेल : पालकमंत्री : कौंडण्यपुरात माता रुक्मिणीचे माहेरघर असून पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेली भूमी आहे. अनेक पिढ्या हा इतिहास विसरू शकत नाही, असा इतिहास लिहीला गेला आहे. वर्धा नदीची पूजा, रुक्मिणी मातेचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन जनतेची सेवा करत राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.