
Raj Thackeray: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा जीआर राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला. दरम्यान यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. तसंच राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्राचा
अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या नरेंद्र जाधव समितीला देखील राज ठाकरेंकडून विरोध करण्यात आलाय.
ठाकरे बंधूंनी हिंदीला विरोध करत दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारनं हिंदी भाषेचे दोन्ही जीआर रद्द केलेत. मराठी माणसांच्या रेट्यानंतर हिंदी भाषेचा जीआर रद्द केल्याचा टोला राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी लगावलाय. नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान यानंतर मनसेकडून या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला होता.
हिंदी भाषेचा जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळातील मार्शलकर समितीनं सादर केलेला अहवालाचा अभ्यास केला जाणार आहे. एवढंच नव्हे तर पुन्हा त्रिभाषा सूत्र लागू करायचं की नाही याबाबत सरकारकडून नरेंद्र जाधव समितीची घोषणा करण्यात आलीय. ही समिती त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र, या समितीला राज ठाकरेंनी विरोध केलाय. कोणतीही समित नेमा, पहिलीपासून हिंदी लादू देणार नसल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.
उद्धव ठाकरेंच्याच काळात त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारण्यात आल्याचा आरोप देखील देवेंद्र फडणवीसांनी केलाय. त्यामुळे राज ठाकरेंनी पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनाच विचारायला हवा होता? असा खडा सवाल फडणवीसांनी राज ठाकरेंना केला होता. यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.
राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. दरम्यान यानंतर राज्य सरकारनं हिंदीचे दोन्ही जीआर रद्द करत नरेंद्र जाधव समिती स्थापन केलीय. त्यामुळे ही समिती त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून कोणता निर्णय घेतं? याकडे आता लक्ष लागलंय.
‘महाराष्ट्रात मराठी भाषाच…’
स्थानिक स्वराज्य स्वस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने परभणी येथे एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी परभणी येथे आले होते,त्यांची दर्गा रोडवर एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती,यावेळी त्यांनी मराठी माणसांनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात उभ्या केलेल्या लढ्याचे कौतुक करीत मराठी माणसांच्या एकजुटीमुळे सरकारला हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा जीआर माघे घ्यावा लागल्याचे ओवेसी म्हणाले.ते म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषाच चालेल, हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, असे म्हणत एकजूट दाखवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. हिंदी भाषा लादू पाहणाऱ्या फडणवीस सरकारला जीआर मागे घ्यावा लागला, ही एकतेची ताकद आहे. महाराष्ट्रातील मराठी बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मराठी जनतेचे कौतुक केले. देशात एक भाषा, एक विचारधारा ही संघाची विचारसरणी आहे. पण विविधतेने नटलेल्या आपल्या भारतामध्ये ती चालू शकत नाही, असेही ओवेसी म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.