
Vasai Virar ED Raid : वसई विरारमध्ये ईडीने 16 ठिकाणी छापेमारी केली आहे. वाय. एस. रेड्डी प्रकरणात ईडीने धाडसत्र राबवले. रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट, बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणारे एजंटच्या घरी ही छापेमारी करण्यात आली. ईडीच्या अनेक अधिका-यांकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे वसई विरार परिसरात खळबळ उडाली आहे.
वसई विरार महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर पडलेल्या ईडी छाप्यानंतर ईडीकडून वसई विरारमध्ये 16 ठिकाणी छापेमारी करण्यात येतेय. रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट, बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणारे एजंट यांच्या घरावर ही छापमारी सुरू असल्याची माहिती आहे. वसई पश्चिम 100 फुटी रोड वरील पद्माराज या इमारतीच्या समोर दोन भारत सरकार चा बोर्ड असणाऱ्या दोन इनोव्हा गाड्या उभ्या असून, याच गाड्यातून ईडी अधिकारी सकाळी सात वाजता वसईत आल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी देखील वसई विरारमध्ये 13 ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. नालासोपा-यातील अनधिकृत 41 इमारत प्रकरणात हे छापे टाकण्यात आले होते. वसई-विरार मनपाचे नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या मुंबई आणि हैद्राबाद इथल्या निवासस्थानांवरही ईडीने छापेमारी केली. या कारवाईत 9 कोटींची रोकड आणि 23 कोटींचे दागिने, सोनं जप्त करण्यात आलंय. वसई मनपा हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम घोटाळा करणारी कागदपत्रंही तपासादरम्यान सापडली होती.
या कारवाईमुळे त्या 41 इमारतींना तत्कालीन काळात सहकार्य देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत …या कारवाईमुळे शहरातील इमारत घोटाळे बाहेर निघण्याची शक्यता आहे ..
65 बेकायदा इमारती प्रकरण
डोंबिवलीत उभारलेल्या 65 बेकायदा इमारतींच्या उभारणीला भूमाफियांबरोबर पालिका अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत,.. अशी मतं मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आहेत. शासनाच्या एका अति उच्चपदस्थ अधिकाऱ्याने या बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफियांवर एमआरटीपीचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिलेत…यामुळे ३५० भूमाफिया आणि पालिकेचे नऊ प्रभाग साहाय्यक आयुक्त अडचणीत येण्याची शक्यताय…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



