digital products downloads

झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे: सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईकांमध्ये सभागृहात जुंपली, माजी वनमंत्री सरकारवर भडकले – Mumbai News

झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे:  सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईकांमध्ये सभागृहात जुंपली, माजी वनमंत्री सरकारवर भडकले – Mumbai News


राज्यात वृक्षतोडीबाबत घेतलेल्या कडक निर्णयावरून महायुती सरकारमधील विद्यमान वनमंत्री आणि माजी वनमंत्र्यांमध्ये सभागृहात चांगलाच वाद रंगला. झाड तोडल्यास थेट 50 हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय मागे घेण्यात आला असून, यामुळे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीव

.

झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री होते. त्यांच्या काळात विना परवानगी झाड तोडल्यास फक्त 1 हजार रुपये दंड असलेली रक्कम थेट 50 हजारांवर नेण्यात आली होती. जंगल तोडणाऱ्यांवर वचक बसेल, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील हा निर्णय आता वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेवरून मागे घेण्यात आला आहे.

नेमके काय म्हणाले मुनगंटीवार?

हा निर्णय मागे घेण्यावरून सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलताना सरकारला घरचा आहेर दिला. वनमंत्री हे विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत? हे मला माहीत नाही. जगात ग्लोबल वार्मिगचा प्रश्न आहे, प्रत्येक गावामध्ये झाड तोडण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे. सध्याच्या निर्णयानुसार झाड तोडता येत नाही असे नाही, फक्त परवानगी घ्यावी लागते. पण, मंत्री महोदय हे विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, झाड तोडल्यास दंडाची रक्कम जर 50 हजारांहून 1 लाख करायची असेल तर मी तात्काळ माघार घेईल. मात्र, हा दंड कमी करायचा असेल तर मी कदापि मागे घेणार नाही. सत्ताधारी पक्षात असूनही मुनगंटीवार यांनी सरकारच्या भूमिकेला थेट विरोध केला. विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हे विधेयक मागे घेण्याला पाठिंबा दिला.

निर्णय मागे घेण्याबाबत वनमंत्र्यांचे स्पष्टीकरण

विधेयकासंदर्भातील चर्चेत बोलताना गणेश नाईक यांनी हा निर्णय मागे घेण्याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, या विधेयकात झाडांची फांदी तोडणेही झाड तोडल्यासारखे आहे. झाडे तोडले तर 50 हजार रुपयांचा दंड आहे. शेतकऱ्यांने अजाणतेपणे झाड तोडले तरी 50 हजार रुपयांचा दंड होता. कुणाला तरी फायदेशीर ठरण्यासाठी हे विधेयक मागे घेतले जात नाही. तसेच, सुधीरभाऊंच्या हेतूविषयी शंका नाही. पण, तात्पुरता हा कायदा मागे घेतोय. नवीन बदलासह कायदा आणू, अशी माहिती देखील वनमंत्री नाईक यांनी यावेळी सभागृहातील चर्चेत उत्तरादाखल दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp