
राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम करण्यात येत आहे,
.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित ‘महिला जन सुनावणी’ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड शहरचे पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पिडीत महिला उपस्थित होत्या.
रहाटकर म्हणाल्या, राष्ट्रीय महिला आयोगाकडे देशातील विविध भागातून पिडीत महिलांच्या तक्रारी प्राप्त होत असतात. या महिलांना दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात येण्याजाण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करता ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत राज्याच्या राजधानी तसेच विभागनिहाय ‘महिला जन सुनावणी’ आयोजित करण्यात येत आहे. येत्या काळात लवकरच महिला जन सुनावणीची शंभरी पूर्ण होणार आहे. या सुनावणीत सर्व संबधित विभागाच्या मदतीने पिडीत महिलांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. त्यामुळे महिलांच्या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्यांने दखल घेवून तक्रारी मार्गी लावण्याकरता पारदर्शकपणे कामे करावीत.
रहाटकर यांच्या समक्ष सुनावणीसह सुरुवात करण्यात आली, आज झालेल्या महिला जन सुनावणीत आयोगाकडे एकूण ३५ प्राप्त तक्रारी, तसेच ऐनवेळी आलेल्या २१ तक्रारीची दखल घेवून कार्यवाही करण्यात आली. यातील २० तक्रारींबाबत जागेवरच निर्णय घेण्यात आले तर उर्वरित प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित तक्रारीची दखल घेण्याचे रहाटकर यांनी निर्देश दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.