
अमरावती येथील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (एडीसीसी) संचालक आनंद काळे यांचे संचालकत्व अपात्रतेच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयाने त्यांना याबाबत विचारणा केली असून आगामी 14 जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सां
.
अध्यक्ष बच्चू कडू यांचे संचालकत्व अलिकडेच रद्द करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळविला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच गटाचे आनंद काळे यांना नोटीस जारी झाल्याने या प्रकरणाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष वेधले आहे. एडीसीसीमध्ये सध्या सत्ताधारी व विरोधकांचा आरोप-प्रत्यारोपांचा अध्याय सुरु आहे. कधी अध्यक्षांकडून विरोधकांवर आरोप केले जातात, तर कधी विरोधकांमार्फत सत्ताधारी मनमानी करतात, असे आरोप केले जातात. या वादातच एक-दुसऱ्याला अपात्र ठरविण्याची स्पर्धा सुरु आहे. याच क्रमात बँकेचे अध्यक्ष बच्चू कडु यांचे निकटवर्तीय संचालक आनंद काळे यांना विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० ची कलम ७३ क (अ) नुसार संचालक पदावरून निष्कासित का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
त्यांच्याकडून १४ जुलैपर्यंत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या बारा संचालकांनी २१ एप्रिल २०२५ रोजी संचालक आनंद काळे यांच्या विरोधात वरिल अधिनियमानुसार तक्रार दाखल केली आहे. काळे पदावर आरूढ झाल्यापासून बँकेच्या हिताविरुद्ध मनमर्जीने काम करत आहे. नियमांशी तडजोड करून ते अपहार करत असल्याचेही या तक्रारीत नमुद केले आहे. कलम ७८ अ नुसार त्यांनी केलेल्या खर्चाचा बोध होत नसल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी या तक्रारीची मागणी आहे. न्यायालयात दाखल केलेल्या एका प्रकरणी नेमण्यात आलेल्या वकिलाची फि बँकेच्या खात्यातून नियमबाह्य देण्यात आली, असाही आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवरच विभागीय सहनिबंधक यांनी आनंद काळे यांना संचालक पदावरून निष्कासित का करू नये? अशी नोटीस बजावली आहे.
नोटीस अप्राप्त, आरोप नैराश्यातून
विभागीय सहनिबंधकाकडून आजच्या तारखेपर्यंत मला कुठलीच नोटीस प्राप्त झाली नाही. विरोधक बँकेची सत्ता मिळविण्यासाठी उठसूठ तक्रारी करत आहेत. मात्र त्यांना यश मिळत नाही. दरम्यान राहिला प्रश्न विरोधकांच्या आरोपांचा तर त्यांचे सर्व आरोप नैराश्यातून आहे. याबाबत मला कुठलीच नोटीस प्राप्त झाली नाही. – आनंद काळे, संचालक, एडीसीसी, अमरावती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.