
Pune Bhondu BaBa: पुण्यातील एका भोंदू बाब अटक करण्यात आली आहे. दिव्य शक्ती असल्याची बतावणी करुन भक्तांना फसवायचा. इतकंच नव्हे तर, भक्तांच्या मोबाईलमध्ये एक अॅप डाउनलोड करायला सांगायचा. या अॅपच्या माध्यमातून तो भक्तांच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला. मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास भाग पडले. या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली असून कोठडीत
आपल्या खाजगी आयुष्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक भक्त हे भोंदू बाबा प्रसाद उर्फ दादा भिमराव तामदार यांच्याकडे येत होते. तरुणांना मृत्यूची भीती दाखवत हा बाबा त्यांना वेश्या आणि प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा आणि त्यांच्या हालचाली सुद्धा आपल्या मोबाईल वरती टिपत असायचा या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झालाय तो देखील या बाबाच्या भक्तामुळेच.
याप्रकरणी एका 39 वर्षीय भक्ताने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा बाबा बावधन परिसरामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली आपली दुकानदारी चालवत होता. आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे असं दावाही तो भक्तांना करायचा. तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यातच अटळ आहे असे भाकीत सांगून त्यांना मानसिक दृष्ट्या कमकुवत करायचा.
मंत्रजाप करण्याच्या बाहाण्याने तो भक्तांना एकांत ठिकाणी बसवून त्यांचा मोबाईल हातात घेत पासवर्ड विचारून मोबाईल मध्ये गुपचूप एअर ड्राइव्ह किड हे हिडन ॲप डाऊनलोड करून ठेवत असायचा ॲप बॅकग्राऊंडमध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भक्ताचा कॅमेरा, आवाज, लोकेशन याचं थेट नियंत्रण मिळवता येत होतं. याच ॲपच्या सहाय्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले, सध्या कुठे आहेत त्यांनी दिवसभरात काय केले याबाबत माहिती सांगत होता यामुळे भक्तांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक बळकट झाला होता.
एका तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी आपल्या आयटी अभियंता क्षेत्रात काम करणाऱ्या एका मित्राला दिला. त्यानंतर त्याने त्याच्या मोबाईलमध्ये एक संशयास्पद ॲप डाऊनलोड झाले असल्याची माहिती त्याला सांगितली. त्यानंतर तात्काळ या तरुणाने तपासणी केली असता त्याच्या सोबतच अन्य सहकारी भक्त होते त्यांच्या मोबाईल मध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या ॲप असल्याचं उघडकिस आले आणि या भोंदू बाबत बिंग फुटलं.
हा बाबा मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडिया वरती प्रचलित होता ज्या महिलांना लग्नानंतर गर्भधारणा होत नाही अशा महिलादेखील या भोंदू बाबाला बळी पडल्या होत्या. गुरुवारी गर्भधारणा न होणाऱ्या महिलेची ओटी भरली की पुत्रप्राप्ती होते असा संदेश देखील सोशल मीडियावरती फिरू लागला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला या बाबाकडे येत असायच्या.
काही तरुण भक्तांना तो त्यांचा काही महिन्यातच मृत्यू होणारा असल्याचा भासवायचा यावर उपाय विचारल्यास बाबा त्यांना प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीची शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडायचा विशेष म्हणजे शरीर संबंध सुरू असताना मोबाईल दिशादर्शक सुरू करून तो मोबाईल विशिष्ट कोपऱ्यात ठेवण्यास सांगत असायचा त्याद्वारे मोबाईलच्या माध्यमातून बाबा त्यांचे खाजगी क्षण पाहत असायचा आणि त्यांचे चित्रीकरण सुद्धा करायचा.
आपल्या अडीअडचणी घेऊन या भोंदू बाबाकडे शेकडो जण गेले होते. त्यापैकी काही जण त्यांच्या जाळ्यात अडकले त्यांनी भक्तांच्या मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करून त्यांचे खासगी क्षण पाहिले त्यामुळे भक्तांनो अशा बाबांपासून सावध राहा आणि आपल्या मोबाईलमध्ये असं कुठला ॲप नाही ना ते देखील तपासा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.