
6 July Hirakud Dam to Release Floodwater: अनेक भविष्यवेत्त्यांच्या मते जुलै महिन्याचा पहिला आठवडा जगासाठी नैसर्गिक आपत्ती आणणारा आहे. यात खूप नुकसान होण्याचं भविष्य वर्तवण्यात आलंय. जुलै महिन्याचे 3 दिवस उलटून गेल्यानंतर यात सत्यता किती हे आता सांगता येणार नाही. पण 6 जुलै हा दिवस भारतातील एका राज्यासाठी भयावह ठरु शकतो. यामागे कारणंही तसंच आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी वेळीच उपाययोजना घेणे आवश्यक आहे. तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
या वर्षी पहिल्यांदाच रविवार 6 जुलै रोजी ओडीशातील हिरकूड धरणातून जास्तीचे पाणी सोडले जाईल. अतिवृष्टीचा इशारा आणि धरणातील वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या बातमीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कारण यामुळे महानदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढू शकते. ज्यामुळे सखल भागात गंभीर पूर येण्याचा धोका आहे. लोकांना तयारीसाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत आणि प्रशासनाने वेळीच तयारी करावी असा इशारा दिला आहे. जेणेकरून कोणतीही दुर्घटना किंवा समस्या वेळेत टाळता येईल.
6 जुलै रोजी सोडले जाईल पाणी
हिरकूड धरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10 वाजता पारंपारिक पूजा झाल्यानंतर धरणाच्या डाव्या बाजूला असलेल्या गेट क्रमांक 7 मधून पाणी सोडले जाईल. 6 जुलै रोजी वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार किती दरवाजे उघडायचे हे ठरवले जाणार आहे.
हवामान विभागाचा इशारा आणखी धोकादायक
सध्या धरणाची पातळी 603.02 फूट आहे. तर धरणाची कमाल क्षमता 630 फूट आहे. पाण्याचा प्रवाह प्रति सेकंद 99467 क्युसेक नोंदवला गेला आहे आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असल्याची माहिती धरणाचे मुख्य अभियंता सुशील कुमार बेहरा यांनी दिली.
13 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, विनाश घडवू शकतो
धरणातून पाणी सोडल्यानंतर, महानदी आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याची पातळी वेगाने वाढू शकते. हे लक्षात घेता ओडिशाच्या 13 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सखल भागात येणाऱ्या पुराचा सामना करण्यासाठी आणि लोकांना वेळेवर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने लोकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मदत आणि बचाव पथके देखील तैनात करण्यात आली आहेत, जी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.
एवढा मोठा धोका का?
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून आणखी तीव्र झाला आहे. ज्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात पुराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अलिकडेच बालासोर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे 60 गावांमधील जनजीवन उद्ध्वस्त झाले होते. आणि आता हिराकुडमधून पाणी सोडल्यामुळे परिस्थिती अधिक भयानक होऊ शकते.
‘सतर्क राहा, आधीच सर्व तयारी करा’
पावसाळ्यात दरवर्षी हिराकुड धरणातून पाणी सोडणे सामान्य आहे पण यावेळी मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यास भाग पाडलंय. लोकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे, महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे घरात सुरक्षित ठेवण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत आणि प्रशासन परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.