
CM Devendra Fadanvis Reaction: महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी वरळीत एकत्रितपणे विजयी मेळावा घेतला. यावेळी ठाकरे बंधुंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर निशाणा साधला. दोन भावांना एकत्र आणणं जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते मुख्यमंत्री फडणवीसांनी करुन दाखवलं, असा टोला राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून लगावला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. राज ठाकरे यांनी मला श्रेय मला दिले याबद्दल फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले. रुदाली सारखे भाषण ऐकायला मिळाले. काहीं जणांची असूया पाह्यला मिळाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘त्यांच्या काळात मराठी माणूस पायउतार झाला’
पहिल्यांदा राज ठाकरे यांचे आभार त्यांनी मानतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळत असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्या ठिकाणी रुदाली भाषण झाले.मराठीचा एक शब्दही त्यांनी काढला नाही. फक्त आमच सरकार गेले. आम्हाला सरकार मधून काढले हेच रुदाली भाषण होते, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 25 वर्षे महापालिका असताना काही काय केले? उलट मोदींच्या नेतृत्वात काम केले. त्यांच्या काळात मराठी माणूस पायउतार झाला. आम्ही विकास केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर टीका केली. यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली. तसेच शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये राज ठाकरेंना उजवं माप देण्यात आला तर उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलयं. 9 विरोधाभास दाखवणारी वाक्य शेअर करण्यात आली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
काय म्हणाले दरेकर?
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजय मेळाव्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी त्यांच्याच भिनली आहे आहे. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंट मधून झाला. तर भाजप आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाविषयी मळमळ आणि गरळ ओकण्याचे काम सध्या सुरु आहे. दोघांच्या भाषणात महिमामंडन सुरू आहे. देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे लोकं फळं येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात. त्यामुळे आता आपलं कसं होणार? हेच आजच्या इव्हेंटवरुन दिसतंय.’पुढे दरेकर म्हणाले की, दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली राज ठाकरे मराठीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत होते, स्पष्टीकरण देत होते, एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते. मात्र सत्ता गेल्याचे वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होतं. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला. झेंडे आणायचे की नाही, वर कोण बसायचं यावरुन सगळे कन्फ्यूज होते. राजकारणाचा दर्प या मेळाव्यात दिसत होता. उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी भिनली आहे, अशी टीका ही दरेकर यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेत कोण कंत्राटदार मोठे केलेत आणि किती मराठी होते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना किती मराठी माणसाचे हित जपले? सरकार मराठी माणसांच्या हितासाठी आपल्याला समर्थन देईल, यात दुमत नक्कीच नाही. भाजपनं सुद्धा मराठी माणसासाठी भूमिका घेतली आहे. अभिजात दर्जा देखील फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने मिळाला आहे. मराठी भाषा भवन तुमच्या काळात उभं राहू शकलं नाही हे देखील सत्य आहे असेही भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.