
आता मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. गटारी तोंडावर आलेली असतानाच बारवाल्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. दारूवरील करवाढीविरोधात बारवाले आक्रमक झालेत. त्यामुळे सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. गटारीच्या तोंडावरच बारवाल्यांनी संप पुकारल्यास मद्यप्रेमींची अडचण होण्याची शक्यता आहे.
गटारी म्हटलं की मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण असतं. मात्र या गटारीला मद्यप्रेमींची काहीशी नाराजी होण्याची शक्यता आहे. कारण, ऐन गटारीच्या तोंडावर बारवाले संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. या बातमीनं मद्यप्रेमींना झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूवरील करवाढ कमी करा अन्यथा परमिट रूम बंद करू, असा थेट इशारा इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट असोसिएशननं सरकारला दिलाय..इतकंच नाही तर दोन दिवसांचा अल्टिमेटमही देण्यात आलाय.
दारूविक्रीवर व्हॅट अर्थात व्हॅल्यू अॅडेड टॅक्स 5 वरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला
– तर दारूविक्रीसाठी लागणाऱ्या परवाना शुल्कात 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली
– उत्पादन शुल्कातही वाढ करण्यात आली
– सरकारच्या या अन्यायकारक करवाढीमुळे उद्योग संकटात सापडल्याचा दावा
– करवाढ कमी करण्यासाठी 2 दिवसांचा इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचा अल्टीमेटम
सरकारनं हॉटेल व्यवसयावर खास करून दारूवर वाढवलेला व्हॅट हा हॉटेल उद्योगांसाठी मारक असल्याचं हॉटेल असोसिएशनचं म्हणणं आहे. सरकारनं तातडीनं करवाढ कमी करावी अन्यथा बेमुदत हॉटेल बंद आंदोलनाचा इशारा हॉटेल संघटनेनं दिलाय.
गटारी अमावस्या आता तोंडावर आलीय. गटारीसाठी उत्सुक असलेले मद्यप्रेमी परमिट रुमकडे धाव करत असतात..मात्र गटारीच्या तोंडावरच बारवाल्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे बारवाले संपावर गेल्यास मद्यप्रेमींची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.