
Maharashtra Monsoon Session 2025 : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांना मारहाण झाली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बॅाडीगार्डकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकारामुळे विधानभवनात गोंधळ उडाला.
विधानभवनाच्या पाय-यांकडे जाताना धक्काबुक्कीचा हा प्रकार घडला. निलम गो-हे यांच्या बॅाडीगार्डकडून वरूण सरदेसाई यांना धक्का देण्यात आला. या धक्काबुक्कीमुळे वरूण सरदेसाई चांगलेच संतप्त झाले. या पूर्वीही नीलम गोऱ्हे यांच्या बॅाडीगार्डकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. नीलम गोऱ्हे या सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा घेऊन फिरतात. आमच्या छातीवर आमदार असल्याचे बिल्ले लावलेले आहेत. तरीही आम्हाला कुणी ओळखत नाही मग आम्ही करायचं काय असा सवाल वरुण सरदेसाईंनी विचारला आहे.
विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. मराठी माणसांना हक्काची घरं मिळावी यासाठी कायदा करा अशी मागणी शिवसेना UBT आमदार अनिल परब यांनी केली. यावेळी उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना UBTचे मराठी माणसावरील प्रेम पुतना मावशीचं असल्याचा हल्लाबोल केला. यानंतर अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्यावरून बोलताना शंभूराज देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करताच शंभूराजे यांचा पारा चांगला चढल्याचे दिसून आलं. त्यानंतर त्यांनी तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास असा एकेरी उल्लेख करत अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान वाद वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर हे शब्द रेकॉर्डवरून हटवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिल्या, त्यानंतर ते शब्द रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.