
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कराड तासवडे टोलनाका परिसरातील एका हॉटेलजवळ एका प्रवाशाला मारहाण करत तब्बल 95 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी भर दुपारच्या सुमारास घडली. प्रव
.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तासवडे टोलनाका परिसरातील श्रावणी हॉटेलजवळ घडली, या ठिकाणी कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी एसटी बस जेवणासाठी थांबली होती. प्रवासी खाली उतरले असताना, चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी प्रवासी प्रशांत कुंडलिक शिंदे यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील असलेला सोन्याचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.
घटनास्थळी जमलेल्या लोकांनी एका संशयितास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, उर्वरित चोरटे फरार झाले आहेत. उर्वरित आरोपींनी कारमधून साताऱ्याकडे पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली.
शिंदे हे कोल्हापूर येथील कृष्णा कुरिअर (कासार गल्ली) या संस्थेचे प्रतिनिधी असून, त्यांच्याकडे कुरिअरद्वारे पाठवण्यात येणारे गोल्ड पॅकिंग होते. त्या बॅगमध्ये 35 हजार रुपयांची रोकड आणि 20 छोट्या डब्यांत सोन्याचे दागिने असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी प्रशांत शिंदे यांच्याकडून अधिकृत तक्रार नोंदवली जात आहे. या प्रकरणाचा तपास तळबीड पोलीस करत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटीमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
हे ही वाचा…
वाल्मीक कराडचा राइट हँड गोट्या गित्तेचे अघोरी कृत्य:’राम नाम सत्य है’ म्हणत रात्री घराबाहेर ठेवायचा नैवेद्य, बीडमध्ये दहशतीचे वातावरण
बीडमध्ये वाल्मीक कराडची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू असतानाच, त्याचा जवळचा सहकारी गोट्या गित्ते याचे नवनवीन प्रकार आता उघड होत आहेत. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात गोट्या गित्ते हा संशयित आरोपी असून, सध्या तो पुन्हा चर्चेत आला आहे. सविस्तर वाचा…
कोकणात पर्यटनासाठी आलेल्या धुळ्यातील जोडप्याची आत्महत्या:वाशिष्ठी नदीत उडी घेत संपवले जीवन, चिपळूनच्या गांधेश्वर मंदिर परिसरातील घटना
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोकणात आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका जोडप्याने चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण येथील गांधेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली असून, तरुणी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.