
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एनआयए विशेष न्यायालय 17 वर्षांनंतर निकाल देणार आहे. या प्रकरणात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहितसह 7 आरोपी आहेत. हे बॉम्बस्फोट 29 सप्टेंबर 2008 रोजी झाले होते.
.
या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला. सुमारे 101 जण जखमी झाले. या स्फोटामागे हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटांशी संबंधित लोकांचा हात असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. 2016 मध्ये एनआयएने आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात 3 तपास संस्था आणि 4 न्यायाधीश बदलले आहेत. यापूर्वी 8 मे 2025 रोजी निर्णय येणार होता, परंतु नंतर तो 31 जुलैपर्यंत राखीव ठेवण्यात आला. 7-11 मुंबई बाॅम्बस्फाेट खटल्यातील 12 आराेपी निर्दाेष ठरल्यानंतर आता मालेगाव स्फाेटाच्या निकालाकडे लक्ष लागून आहे.

निर्णयाचे मिनिट-टू-मिनिट अपडेट्स पाहण्यासाठी, खालील लाईव्ह ब्लॉग पाहा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.