Malegaon Blast Case Verdict Updates: नाशिकच्या मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी आज न्यायालयात निकाल जाहीर करण्यात आला. तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आहे. कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
बॉम्बस्फोटात जे जखमी झालेत किंवा मृत्यू झालेत ते बॉम्ब स्फोटामुळेच झाले आहेत हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या दुचाकीमध्ये आरडीएक्स लावण्यात आले होते हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. मा्त्र बाईक प्रज्ञासिंह ठाकूरची होती, याचा कोणाताही पुरावा सापडला नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर , सुधाकर द्विवेदी , सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सातही आरोपींनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात लादण्यात आलेले UAPA कलमदेखील सिद्ध होऊ शकले नाही, असा महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्याचबरोबर, राहिरकर, प्रसाद पुरोहित, उपाध्याय यांच्या संस्थेला मिळालेला निधी स्फोटाचा कट रचण्यासाठी वापरला गेला, हेदेखील सिद्ध होऊ शकले नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
बॉम्बस्फोटात जे जखमी झालेत किंवा मृत्यू झालेत ते बॉम्ब स्फोटामुळेच झाले आहेत हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या दुचाकीमध्ये आरडीएक्स लावण्यात आले होते हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. मा्त्र बाईक प्रज्ञासिंह ठाकूरची होती, याचा कोणाताही पुरावा सापडला नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
निर्दोष मुक्तता होताच आरोपींनी अश्रू अनावर
न्यायालयाने सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले आहे. समीर कुलकर्णी यांनी आमचा पुनर्जन्म झाला असं म्हटलं आहे. तसंच, 17 वर्ष आम्ही पिडीत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
निर्दोष मुक्तता झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह काय म्हणाल्या?
मला गेल्या 17 वर्षात खूप अपमान सहन करावा लागला, स्वतःच्या देशात आम्हाला आतंकवादी बनवण्यात आले
मी संन्यासी आहे म्हणून कदाचित मी जिवंत आहे, मी दररोज मरत होते. आज मला आनंद झाला, कोण तरी आहे जो माझा आवाज ऐकत आहे. हिंदुत्व आणि भगव्याचे आज विजय झाला, असं साध्वी प्रज्ञ्रा सिंह यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.