
Malegaon blast verdict: मुंबई येथील विशेष NIA न्यायालयाने 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपी बेकायदेशीर ठरवले. त्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर आणि लेफ्टिनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश होता. मात्र, अशातच आता निकालानंतर कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
भारतीय लष्करातील प्रतिष्ठित गुप्तचर विभागात कार्यरत असलेले कर्नल पुरोहित यांच्यावर 2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होत. मात्र जवळपास 9 वर्षांनंतर 2017 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.
17 वर्षांनंतर कर्नल पुरोहित यांची निर्दोष मुक्तता
आज NIA न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणाची तपासणी करणाऱ्या NIA च्या विशेष न्यायालयाने कर्नल पुरोहित यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांच्यावर UAPA गैरकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा लावणे अयोग्य असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आणि त्यांची निर्दोष मुक्तता केली.
कोण आहेत कर्नल पुरोहित?
लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित हे भारतीय लष्करातील एक अनुभवी अधिकारी असून ते लष्करी गुप्तचर विभागात कार्यरत होते. त्यांना हिंदी, संस्कृत आणि मराठी भाषांचे उत्तम ज्ञान आहे. राष्ट्रवादी विचारसरणीचे समर्थक मानले जाणारे कर्नल पुरोहित हे कर्तव्यनिष्ठ, बुद्धिमान आणि मेहनती अधिकारी म्हणून ओळखले जातात. जम्मू-कश्मीरमधील अतिरेकी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याच्या मोहिमांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
मालेगाव स्फोटात त्यांचे नाव कसे आले?
2008 रोजी मालेगाव शहरात एक भयंकर बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. हा स्फोट एका मोटारसायकलमध्ये लपवलेल्या स्फोटकांद्वारे घडवण्यात आला होता. तपासादरम्यान मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक हा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याशी संबंधित आढळून आला. यानंतर तपास अधिक खोलवर सुरू झाला आणि या प्रकरणात कर्नल पुरोहित यांचे नाव पुढे आले.
त्यावेळी त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता की ‘अभिनव भारत’नावाची संघटना त्यांनी स्थापन करून या संघटनेच्या माध्यमातून स्फोटाची योजना आखल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यासोबतच त्यांनी स्फोटासाठी स्फोटके देखील पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.