
बीड जिल्ह्यातील बहुचर्चित महादेव मुंडे हत्या प्रकरणात अखेर 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
.
परळी येथील व्यापारी तथा पिग्मी एजंट महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात आढळला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. अखेर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरूवारी या प्रकरणी मुख्यमंत्री महादेव मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींची नावे कळली नाहीत. पण ही एक मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.
उशिराने का होईना तपासाला मुहूर्त मिळाला
आमदार रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारे या अटकसत्राची माहिती दिली. ते या प्रकरणी म्हणाले की, महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार आरोपीना आज सकाळी अटक करण्यात आली असून दोन वर्षे उशिराने का होईना अखेर पोलिस तपासाला आज मुहूर्त मिळाला असेच म्हणावे लागेल.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली यावरून राजकीय दबावामुळे पोलीस यंत्रणांचे हात बांधले गेले होते का ? मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नमस्कार केला तरच पोलिस कारवाईला सुरवात करतात का? ज्यांना न्याय हवाय अशा सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यासमोर रांग लावायची का? असे प्रश्न आज निर्माण होतात. असे असेल तर राज्यातली बिघडलेली कायदा सुव्यवस्था बघता लांबच लांब रांगा लागतील.
असो, या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी खुलेआम फिरत होता तो आता फरार असून त्याच्या देखील मुसक्या पोलीस लवकरच आवळतील ही अपेक्षा. एसआयटी तपासाच्या माध्यमातून मुंडे कुटुंबाला लवकर न्याय मिळावा व बीड जिल्हा दहशतमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी ‘राजकीय मैत्री’ बाजूला सारून विशेष लक्ष पुरवावे ही विनंती, असे त्यांनी म्हटले आहे.
महादेव मुंडेंना न्याय मिळेल ही अपेक्षा – जितेंद्र आव्हाड
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या कारवाईचे स्वागत केले. तसेच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व पोलिसांवर असणाऱ्या दबावामुळेच आतापर्यंत या प्रकरणी कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज सकाळी 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती समजते आहे. काल महादेव मुंडे यांच्या पत्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्या आणि आज लगेच आरोपींची धरपकड देखील करण्यात आली. याचाच अर्थ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांवर असणाऱ्या दबावामुळेच या प्रकरणात कारवाई करण्यात येत नव्हती. महादेव मुंडे यांना लवकरच न्याय मिळेल अशी आशा आता वाटत आहे, असे ते म्हणालेत.
महादेव मुंडे यांच्या हत्येचा घटनाक्रम
- 20 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा. महादेव मुंडे यांनी आपल्या मुलांना ट्युशनहून घरी सोडले.
- त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले. ते हनुमान नगर मोंढा मार्केटच्या शिवाजी चौकात रात्री 7.10 वा. सीसीटीव्हीमध्ये दिसले.
- आझाद चौकात मित्राला भेटले.
- आझाद चौकापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वा. आढळली.
- ही मोटारसायकल पोलिसांनी पोलिस स्टेशनला आणून लावली. याच गाडीवर रक्त सांडलेले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
- याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबूक आदी दस्तऐवज होते.
- ही मोटरसायकल सापडली, पण महादेव मुंडे कुठे होते? याचा पत्ता लागत नव्हता. मोटरसायकलजवळ दोन चपला सापडल्या. त्यातील एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कुणाची होती? याबाबत माहिती भेटली नाही.
- दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली, त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. यामुळे हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.
- 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.10 वा. पोलिस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांनी महादेव मुंडे यांचे मेहुणे सतीश फड यांना फोन केला.
- हा फोन आल्यानंतर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. पण तो फोन स्विच ऑफ आला.
- त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली. त्यांना मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले.
- महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या. त्यांचा गळा चिरलेला होता. याशिवाय त्यांच्या हात व पाठीवरही वार होते.
- महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मीचे कलेक्शन साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते.
- महादेव मुंडे यांचे कुटुंबीय त्यांचा मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवणार होते. पण पोलिसांनी 8 दिवसांत आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.
- त्यानंतर अनेक चकरा मारूनही प्रकरणाचा तपास लागला नाही. त्यामुळे मुंडे कुटुंबीयांनी सदरील प्रकरण एलसीबीला वर्ग करण्याची विनंती परळी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पीआय सानप यांना केली.
- 16 डिसेंबर 2023 रोजी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते.
- पीडित कुटुंबाने हा गुन्हा एलसीबीला वर्ग करण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली.
- 1 ऑगस्ट 2025 रोजी अखेर या प्रकरणी 4 आरोपींना अटक.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.