
Raksha Bandhan Special : रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण आहे. हे नातं प्रेमासोबत रुसवे फुगवे सोबत अत्यंत संवेदनशील असतं. महाराष्ट्राच्या राकारणात अशा अनेक प्रसिद्ध बहीण भावाच्या जोड्या आहेत जे राजकीयदृष्ट्या एकमेंकासोबत दिसतात तर काही विरोधात आहे. अनेर महत्त्वाच्या प्रसंगी भाऊ – बहिणीचं भावनिक राजकारण उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आज आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने राजकारणातील बहीण भावाबद्दल जाणून घेणार आहोत.
1. अजित पवार-सुप्रिया सुळे
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे चुलत बहिण-भाऊ आहेत. अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर सत्तेसाठी पुन्हा शरद पवारांची साथ सोडून भाजपशी हात मिळवणी. गेल्यावर्षी खासदार सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर असल्याने त्यांनी अजित पवार यांना राखी बांधली नाही. तर दुसरीकडे अजित पवारही त्यांच्या पूर्वनियोजित मुंबई दौऱ्यावर होते. त्यामुळे त्या दोघांनाही रक्षाबंधन साजरा केला नाही. काहीच दिवसांपूर्वीच युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत साखरपुडा पार पडला. तेव्हा अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. त्यामुळे यंदा सुप्रिया सुळे आणि अजित पवार रक्षाबंधन साजरं करणार का याकडे सर्वांच लक्षं लागलंय.
2. धनंजय मुंडे-पंकजा मुंडे
बीडमधील मुंडे भाऊ-बहिणीमधल्या हे कायम महाराष्ट्रात राजकारणात कायम चर्चेत असतात. राजकारणामुळे मुंडे बहीण भावांमध्ये अनेक वेळा सुप्त संघर्ष पाहिला मिळाला. पण राजकारण्याचा मैदानात वैरी असले तरी घरात हे बहीण भाऊ अनेक प्रसंगी एकत्र उभे असलेले दिसले.
3. पकंजा मुंडे – महादेव जानकर
रासपचे नेते महादेव जानकर यांनी गोपीनाथ मुंडे यांनी 14 वर्षापूर्वी मुलगा मानलं तेव्हा पासून दरवर्षी पंकजा मुंडे यांच्या हस्ते राखी बांधून घेतात. यात एकदाही खंड पडला नाही. पंकजाताई, प्रीतमताई,ॲड. यशश्री यांच्याकडून ते दरवर्षी राखी बांधून घेतात.
4. बाळासाहेब थोरात-दुर्गा तांबे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि त्यांची बहीण दुर्गा तांबे ही सुद्धा महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाची भावा-बहिणींची जोडी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या बहीण दुर्गा तांबे यादेखील राजकारणात आहेत.
5. अवधूत तटकरे-आदिती तटकरे
रायगडच्या राजकारणामध्ये तटकरे कुटुंबात राजकारणातले भाऊ-बहीण पाहायला मिळतात. तटकरे कुटुंबीयांमध्ये अनील तटकरे आणि सुनील तटकरे असे दोन बंधू. अनिल हे मोठे तर सुनील हे लहान भाऊ आहेत. सुनील तटकरे यांच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे राजकारणात आले. अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरेही राजकारणात आला आहे. तटकरे कुटुंबातील वादाची राजकीय वर्तुळात कायम चर्चा झाली. सध्या अनिल तटकरेंचं कुटुंब शिवसेनेत तर सुनील तटकरेंचं कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
6. जयंत पाटील – मिनाक्षी पाटील
याच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या बहीण मिनाक्षी पाटील हे सुद्धा आहेत.
7 राहुल गांधी-प्रियंका गांधी
देशाच्या राजकारणाचा विचार केल्यास सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे सध्याच्या राष्ट्रीय राजकारणातील चर्चिंत भाऊ बहिणी आहेत. गेल्या काही काळापासून अडचणीचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाला योग्य दिशा देण्याचे काम दोघेही करत आहेत.
8 माधवराव शिंदे-वसुंधरा राजे
भारताच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली भावंडे म्हणून माधवराव शिंदे आणि वसुंधरा राजे यांचे नाव घेता येईल. दिवंगत माधवराव शिंदे यांनी केंद्रात विविध मंत्रिपदांवर काम केले होते. तर वसुंधरा राजे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्याबरोबरच या दोघांच्याही बहीण यशोधरा राजे यांनी मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले आहे.
9 विजय बहुगुणा आणि रीटा बहुगुणा जोशी
दिवंगत नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या पश्चात विजय बहुगुणा आणि रीटी बहुगुणा जोशी यांनी उत्तराखंडच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केलेली आहे. विजय बहगुणा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद सांभळले होते. तर रीटा बहुगुणा जोशी या सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.
10 स्टॅलिन-कनिमोळी
दक्षिणेकडील तामिळानाडूच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या एम. करुणानिधी यांची अपत्ये असलेल्या स्टॅलिन आणि कनिमोळी यांनी डीएमके पक्षाच्या माध्यमातून तामिळनाडूमधील जनमानसात आपली छाप सोडली आहे. स्टॅलिन हे सध्या डीएमकेचे प्रमुख आहेत. तर कनिमोळी या यूपीए सरकारच्या काळात केंद्रात मंत्रिपदावर होत्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.