
फुलंब्री तालुक्यातील लहान्याच्या वाडीतगिरिजा नदीवर पूल नसल्यानेशिक्षणासाठी ११ किमीचा फेरा पडतो.त्यामुळे थर्माकोलच्या तराफ्यावर बसूनदोरीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना नदी पारकरावी लागते. पूल नसल्यानेदळणवळणाची व्यवस्थाही ठप्प आहे.पालकांसह विद्
.
लहान्याची वाडीवरील ५ वस्तीच्या विद्यार्थ्यांना मुख्य गावात शिक्षणासाठीयावे लागते. शाळेत जाण्यासाठी नदीओलांडावी लागते. मात्र अद्याप पूल नझाल्याने या मुलांना थर्माकोलच्यापाट्यांच्या साहाय्याने तयार केलेल्या तराफ्यातून शाळा गाठावी लागते. त्यामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थी ये-जा करतात. रोज जीव मुठीत घेऊन हे विद्यार्थीथर्माकोलवर बसून पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करतात. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास शाळा बंद ठेवण्याची वेळ हीपालकांवर येते. या संदर्भात आम्ही नेहमी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे, परंतुकुठल्याही प्रकारे याची दखल घेण्यातआली नाही. शासनाने लवकरात लवकरयेथे पूल मंजूर करावा. नसता ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेसरपंच सुधाकर बहुरे यांनी सांगितले.
थर्माकोलवर पत्रा बांधून दोन्ही काठांवर बांधली दोर
पूल नसल्याने येथील नागरिकांनीथर्माकोलवरती पत्रा बांधून नदीच्यादोन्ही काठास दोर बांधली आहे. त्यादोरीचा आधार घेत थर्माकोलवर बसूनजलप्रवास करून शालेय विद्यार्थी वनागरिक ये-जा करतात. तसेचलहान्याची वाडी परिसरातील गिरिजानदीत सिमेंट बंधारा बांधला.बंधाऱ्यावरून नागरिकांनी जा-ये केली.मात्र, त्या सिमेंट बंधाऱ्यावर पाण्यामुळेशेवाळ आल्याने पास घसरतो.
पाण्यामुळे शाळेत पाठवत नाही
^गिरिजा नदीला पाणी आल्यानंतर अनेक वेळाआई-वडील शाळेत पाठवत नाहीत. पाण्याचा प्रवाहथोडा कमी झाल्यानंतर थर्माकोलवर बसत माझाभाऊ मला गिरिजा नदीतून दुसऱ्या बाजूला सोडतो.शाळा सुटल्यानंतर पुन्हा घरी घेऊन येतो. येथे पूलझाल्यानंतर आम्हाला वेळेत शाळेत जाता येईल.
-तनुजा बनसोडे, विद्यार्थिनी
पुढील वर्षापर्यंत पूल बांधणार
^फुलंब्री तालुक्यातील लहान्याच्या वाडीतगिरिजा नदीवर पूल व्हावा म्हणून मीप्रयत्नशील आहे. यासाठी खूप मोठ्यानिधीची गरज आहे. येथील विद्यार्थी वग्रामस्थांची निराशा होऊ नये. पुढील पावसाळ्यापर्यंत येथे पूल बांधण्यात येईल. -अनुराधा चव्हाण, आमदार
नदीला पाणी आल्यानंतरतुटतो अर्ध्या गावाचा संपर्क
लहान्याची वाडी येथे पहिली तेआठवीपर्यंत शाळा आहे, परंतु अर्धे गावएका तीरावर तर अर्धे गाव गिरिजानदीच्या दुसऱ्या तीरावर गिरिजा नदीच्याकाठावर आहे. लहान्याची वाडीगावांतर्गत बहादुरे, बनसोड, आवळी,गोगाई, लहाने वस्ती अशा पाच वस्त्याआहेत. अर्धे गाव नदीच्या दुसऱ्या बाजूलाआहे. या भागात दोन हजार लोकसंख्याआहे. त्यामुळे नदीला पाणी आल्यानंतरअर्ध्या गावाचा संपर्क तुटतो.
आतापर्यंत तीन जणांचा पाय घसरून पाण्यात बुडून झाला मृत्यू
येथे पूलनसल्याने आतापर्यंत तीन व्यक्तींना पावसाळ्यात आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये२०२० मध्ये संगीता करतारे, २०२३ मध्ये अमोल बनसोडे व २०२४ मध्ये गणेश बहादूरे असे जीवगमावलेल्या व्यक्तींचे नाव आहे. येथे छोटा सिमेंट बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्यावरपावसाळ्यात शेवाळ असते. या बंधाऱ्यावरून पाय घसरून वरील तिघांचा मृत्यू झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.