
Pune Video Viral: पुणे शहरातील खराडी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. एका चारचाकी वाहनावर चालत्या स्थितीत तरुण-तरुणी चढून सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा प्रकार केवळ धोकादायकच नाही तर वाहतूक नियमांना जाहीरपणे हरताळ फासणारा असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मुख्य रस्त्यावर घडला. गाडी सरळ मार्गाने जात असताना दोघंही वाहनाच्या वरती बसून रोमान्स करताना दिसत आहेत. दोघेही कारवर रात्रीच्यावेळी मस्त एकमेकांसोबत वेळ घालवत होते. त्यांची ही कृती रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांचं लक्ष विचलित करणारी होती. काही क्षणांचा हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला.
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी
या प्रकारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. पुण्यातील वाहतूक पोलीस विभागाने या प्रकरणाची दखल घेतली असून गाडीचा नंबर शोधून संबंधित तरुण-तरुणींचा शोध सुरू केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार IPC आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अशा बेजबाबदार आणि धोकादायक वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. हे केवळ स्वतःच्या जीवाशी खेळणे नाही तर इतरांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणे आहे. अशा शब्दांत लोकांनी टीका केली आहे. काहींनी पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत वाहतूक नियम पाळण्याबाबत आणि सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या प्रकारांबाबत चर्चा रंगली आहे.
FAQ
हा प्रकार कधी आणि कुठे घडला?
हा प्रकार रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर घडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडिओत काय दिसत आहे?
व्हिडिओत गाडी सरळ मार्गाने जात असताना दोघे वाहनाच्या वरती बसून रोमान्स करताना दिसत आहेत. जे इतर वाहनचालकांचं लक्ष विचलित करणारं होतं.
या घटनेमुळे काय परिणाम झाला?
या प्रकारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आणि अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.