digital products downloads

अजिंठा लेणीत बसेस अपुऱ्या: पर्यटक तीन तास ताटकळले, दुपारनंतर वाढल्या; दिवसभरात 5 हजार पर्यटकांची भेट – Chhatrapati Sambhajinagar News

अजिंठा लेणीत बसेस अपुऱ्या:  पर्यटक तीन तास ताटकळले, दुपारनंतर वाढल्या; दिवसभरात 5 हजार पर्यटकांची भेट – Chhatrapati Sambhajinagar News


अजिंठा लेणी परिसरात बसचे तिकीट काढण्यासाठी अनेकांना तीन तास रांगेत उभे राहावे लागले.‎

शनिवारी रक्षाबंधनानिमित्त आणि रविवार‎अशा सलग दोन दिवस सुट्या आल्याने‎पर्यटकांनी अजिंठा लेणीला पसंती दिली.‎रविवारी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात‎वाढल्याने राज्य परिवहन मंहामंडळाचे‎नियोजन कोलमडल्याचे दिसून आले. बसेस‎कमी पडल्याने पर्यटकांना ३ तास रा

.

सलग दोन दिवस सुट्या असतानाही‎महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने‎पर्यटकांच्या सेवेसाठी रविवारी सकाळपासून‎फक्त सातच बस ठेवल्या होत्या. पर्यटक‎सकाळपासून गर्दी करत होते. यामुळे या बसेस‎अपुऱ्या पडत होत्या. पर्यटकांच्या लांबच‎लांबच रांगा लागल्या होत्या. वाहक अगोदर‎बुकिंग न करता बस आल्यावर तिकीट देत‎असल्याने आणखीच उशीर होत होता. यामुळे‎पर्यटक त्रस्त झाले होते. सकाळी बाराला‎बससाठी लाइनमध्ये उभे असलेल्या पर्यटकांचा‎अडीच ते तीन वाजता नंबर येत होता. या मुळे‎काही पर्यटकांनी चार किलोमीटर पायी चालत‎जाऊन लेणी गाठली तर काही हताश होऊन‎परत गेले. दुपारनंतर ३ बसेसमध्ये वाढ‎करण्यात आली. तरीही पर्यटकांची संख्या कमी‎होत नव्हती.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp