
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभाराव प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आवाज उठवतोय. पुराव्यानिशी निवडणूक आयोगाची पोलखोल करतोय. मुख्यमंत्री, राज्यपालांना याची माहिती दिली. पण कोणी दाद द्यायला तयार नाही. भ्रष्टाचार ही या सरकारीच अपरहार्यता झालीय, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.
दिल्लीत विरोधी पक्षाच्या खासदारांना पकडून बाजूला नेऊन अटक करण्यात आली. सरकारने केलेली कृती म्हणजे लोकशाहीला बट्टा लावणारी आहे. ही लढाई निवडणूक आयोगाविरोधातली आहे. मग सरकार मध्ये का पडतंय? यातून सर्व उघड झालंय. दिल्लीमध्ये सरकारने केलेला तमाशा निंदनीय आहे. खासदारांना खोटं सांगून पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. खासदारांना पोलीस स्टेशनला नेऊन संसदेत 2 बील मंजूर करुन घेण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले.
आज 2 ठिकाणी जनआंदोलन झाली. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलंय. आम्ही अनेकदा पुरावे देऊन या सरकारच्या भ्रष्टाचाराची माहिती दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधींनी सर्व पोलखोल केली तरी त्यांच्याकडेच अॅफेडेव्हीट मागितला जातो. खरं तर पंतप्रधानांही ही माहिती एकत्र बसून समजून घ्यायला हवी. 6 महिन्यात 45 लाख मतं वाढली. आपली नावं तपासा, आणि कोणी घुसलंय का? हे तपासण्याचे आवहन उद्धव ठाकरेंनी केलाय.
सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोगाचे आयुक्त मोठे आहेत का?
आम्हाला आमच्या कर्तुत्वावर विश्वास आहे. आता ते सापडले तर त्यांच्या गोष्टी ऐकण्यात रस आहे. भाजपच्या एका नेत्याने ईव्हीएम कसं हॅक केलं जातं याच प्रशिक्षण दिलं, असेही ठाकरे म्हणाले. आता ते नेते नाहीत फक्त भाजपमध्ये आहेत,असेही ते म्हणाले. आम्ही माहिती देणार नाही, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोगाचे आयुक्त मोठे आहेत का? असा प्रश्न विचारत दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या होतेय, असेही ते म्हणाले.
हा भ्रष्टाचार तुम्हाला पटतोय का?
ट्रम्प धमकी देतायत हे देशावरच संकट आहे. असे असताना पंतप्रधानांनी सर्वांना बोलावून याचा समाना कसा करायचा हे विचारणं अपेक्षित होतं. देशातला हा भ्रष्टाचार तुम्हाला पटतोय का? असा प्रश्न ठाकरेंनी मतदारांना विचारला. तुमची ओळख पटवून द्या, असं ते मतदारांनाच सांगतात. ग्रामीण भागातील अनेकांकडे जन्माचा दाखला नाही. ही मत आपल्या विरोधात आहेत. त्यांची छाटणी केली जाते. आणि राहुल गांधींनी दाखवल्याप्रमाणे मताची चोरी होते, असे ठाकरे म्हणाले.
FAQ
1. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर कोणते आरोप केले आहेत?
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणाचे आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट (VVPAT) काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मतदान प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे. तसेच, आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला माहिती देण्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला.
2. ठाकरेंनी सरकारवर कोणते गंभीर आरोप केले?
ठाकरेंनी सरकारवर लोकशाहीला बट्टा लावण्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, दिल्लीत विरोधी पक्षाच्या खासदारांना खोटे बोलून पोलिस स्टेशनला नेऊन अटक केली गेली आणि त्याचवेळी संसदेत दोन विधेयके मंजूर करून घेतली गेली. हा लोकशाहीविरोधी “तमाशा” असल्याचे ते म्हणाले.
3. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत ठाकरेंनी काय म्हटले?
ठाकरेंनी निवडणूक आयोगाला “चुना लगाव आयोग” संबोधत त्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, आयोग पुराव्यांकडे दुर्लक्ष करतो आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वतःला मोठे समजतो, ज्यामुळे “दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या” होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.