
Mohan Bhagwat on Education And Health Facilities : शिक्षण आणि आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घरचा आहेर दिलाय.. देशातील महागडे शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्यात. माणूस आपलं घर विकेल, मात्र तो आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देतो. त्याचप्रमाणे, आरोग्यासाठीही माणूस आपली संपूर्ण बचत गुंतवण्यास तयार असतो. पूर्वी ही क्षेत्रं सेवेचं साधन मानली जात होती, मात्र आता त्यांचं पूर्णपणे व्यापारीकरण झाल्याचं सरसंघचालकांनी म्हटलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी इंदूर येथील एका कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या सद्यस्थितीवर थेट भाष्य करताना सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला.
सरसंघचालक स्पष्ट शब्दांत काय म्हणाले?
‘देशातील शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पूर्वी ही क्षेत्रे सेवेचे साधन मानली जात होती, परंतु आता त्यांचे पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे’ असं ते म्हणाले.
‘ज्ञानाच्या या युगात शिक्षण खूप महत्वाचे आहे, यासाठी माणूस आपले घर विकेल, परंतु तो आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा मानस बाळगेल. तसंच आरोग्यासाठीही माणूस आपली संपूर्ण बचत गुंतवण्यास तयार होतो जेणेकरून त्याला चांगल्या ठिकाणी उपचार मिळतील’ हे वास्तव समोर ठेवत ते म्हणाले की, समाजात सर्वात जास्त गरज असलेली गोष्ट म्हणजे शिक्षण आणि आरोग्य, परंतु दुर्दैवाने आज या दोन्ही सुविधा स्वस्त नाहीत आणि सहज उपलब्ध नाहीत.
देशात शाळा आणि रुग्णालयांची संख्या वाढत नाहीत असं म्हणणं गैर असेल कारण, त्यांची संख्या सतत वाढत आहे, परंतु विचार केला तर असे दिसून येतंय की या सुविधा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहेत ही वस्तुस्थितीही त्यांनी नाकारली नाही
इतकंच नाही तर भारताची शिक्षण व्यवस्था ‘ट्रिलियन डॉलर्स’चा व्यवसाय बनली असल्याचंही कुठेतरी ऐकल्याचं भागवतांनी यावेळी सांगत जिथे व्यवसाय बनतो तेव्हा तो आपोआप सामान्य माणसाच्या तो आवाक्याबाहेर जातो असंही वास्तव त्यांनी अधोरेखित केलं.
बदल होणार की नाही?
सेवा क्षेत्रांच्या बाजारीकरणावरून मोहन भागवतांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर आता चर्चांना उधाण आलं असून राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
एकीकडे देशभरात खासगी शाळांची मनमानी फी वाढ आणि रुग्णालयांतील उपचारांच्या महागड्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आता खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनीच सत्ताधाऱ्यांचे कान टोचल्यामुळे आता काय बदल होतायत का? याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
FAQ
मोहन भागवत यांनी इंदूरमध्ये काय विधान केले?
मोहन भागवत यांनी इंदूर येथील कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान सांगितले की, देशातील शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत आणि या क्षेत्रांचे पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे.
त्यांनी शिक्षण आणि आरोग्याच्या महत्त्वाबाबत काय म्हटले?
त्यांनी म्हटले की, ज्ञानाच्या युगात शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, ज्यासाठी माणूस आपले घर विकायला तयार आहे. तसेच, आरोग्यासाठी लोक संपूर्ण बचत खर्च करतात, परंतु या सुविधा आता स्वस्त नाहीत आणि सहज उपलब्ध नाहीत.
पूर्वी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र कसे होते, असा त्यांचा दावा आहे?
मोहन भागवत यांनी सांगितले की, पूर्वी शिक्षण आणि आरोग्य हे सेवेचे साधन मानले जात होते, परंतु आता त्यांचे व्यापारीकरण झाले आहे, ज्यामुळे ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.