
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. तृतीय वर्षात शिकणाऱ्या राजस्थानमधील एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कथित मानसिक छळाला कंटाळून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. आवेश कुमार असे विद्यार्थ्याचे नाव असून, आत्महत्येपूर
.
मिळालेल्या माहितीनुसार, आवेश कुमार हा सिव्हिल लाइन्स परिसरातील शीतला माता मंदिर चौकात भाड्याच्या खोलीत राहत होता. प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून त्याने रविवारी याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी त्याने मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हाताने लिहिलेली चिठ्ठी पोस्ट केली होती. आवेशचा हा व्हाट्सअॅप मॅसेज येताच त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्या खोलीवर धाव घेत त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून काढून उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. मात्र महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्याची स्थिती सध्या धोक्याबाहेर असल्याचा दावा केला आहे.
सुसाईड नोटमध्ये काय म्हटले?
प्राध्यापक डॉ. प्रशांत बागडे यांनी आवेश कुमार यांच्या आईबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. तसेच, सततच्या मानसिक छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यात आहे. वैद्यकीय शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी वागणूक आदराने ठेवली पाहिजे. गरज पडल्यास शिक्षा देऊ शकतात, पण पालकांबद्दल अपशब्द वापरण्याचा कुणालाही अधिकार नाही. भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्यासोबत असा प्रकार घडू नये. माझ्या निर्णयासाठी माझ्या मित्र-मैत्रिणी जबाबदार नाहीत. कृपया माझ्या आईवडिलांची काळजी घ्यावी, असेही आवेश कुमारने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
यापूर्वीही एका विद्यार्थ्याने केली होती आत्महत्या
या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून, घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीअंती नेमके कारण स्पष्ट होईल. विशेष म्हणजे, याआधीही या महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
हे ही वाचा…
भिंवडी दुहेरी हत्याकांडाने हादरली:चार ते पाच जणांचा धारदार शस्त्राने हल्ला, भाजप पदाधिकाऱ्यासह सहकाऱ्याचा खून; परिसरात खळबळ
भिवंडी शहरात धारदार शस्त्राने दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे सहकारी तेजस तांगडी यांचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच अज्ञातांनी ही हत्या केल्याची माहिती मिळत आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा खारबाव-चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे घडली असून, या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.