digital products downloads

‘रात्री घेतलेल्या दारुचा वास अजूनही येतोय,’ विधानसभेत CM च्या वाक्यावर उत्तर आलं; ‘मी त्यांना जवळ घेतलं असतं ना..’

‘रात्री घेतलेल्या दारुचा वास अजूनही येतोय,’ विधानसभेत CM च्या वाक्यावर उत्तर आलं; ‘मी त्यांना जवळ घेतलं असतं ना..’

Liquor Ban In Maharashtra Dig At CM: लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते असं बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या आचार्य अत्रे (Acharya Atre) यांची बुधवारी, 13 जुलै रोजी 197 वी जयंती. याच दिवशी 1828 मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवडजवळच्या कोडित खुर्द या गावात प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते म्हणून आचार्य अत्रेंचं योगदान फार मोठं आहे. अत्रे हे त्यांच्या लेखणीबरोबरच हजरजबाबीपणासाठी ओळखले जायचे. त्यामुळेच अत्रेंचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त असाच एक किस्सा पाहणार आहोत ज्यामध्ये अत्रेंच्या तोंडाला दारुचा वास येतोय असं थेट मुख्यमंत्र्‍यांनी विधानसभेच्या सभागृहात म्हटलं होतं आणि त्याला अत्रेंनी त्याहून भन्नाट उत्तर दिलेलं. नेमकं घडलेलं काय पाहूयात…

कधीचा आहे हा किस्सा?

तर हा प्रकार घडला त्यावेळी गांधीवादी नेते मुरारजी देसाई हे 1952 साली बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्यात दारुबंदी जाहीर केली होती. मात्र ज्याला घरात बसून मद्यपान करायचं आहे त्याला विशेष परवानगी देण्यात आलेली. मात्र राज्यात चोरटी दारुविक्री सुरुच होती. मात्र या परवान्यांना बगल देऊन घरी दारु गाळणाऱ्यांचीही त्यावेळेस कमी नव्हती. विशेष परवान्याची परवा न करता अनेकजण घरातच दारु गाळायचे. यावरुन सरकारवर टीका व्हायची. आचार्य अत्रे स्वत: या दरुबंदीची टींगल करायचे. 

अत्रे सभागृहात या विषयावर काय म्हणाले?

आचार्य अत्रे हे आमदार असल्याने ते प्रश्नांच्या माध्यमातून आपलं म्हणणं लावून धरत. मात्र कितीही टीका झाली तरी मुख्यमंत्री देसाई हे दारुबंदीचे फायदे सांगायचे. दारुबंदीच्या याच गोंधळावरुन एकदा विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. चर्चा ऐन रंगात आलेली असताना त्यात आचार्य अत्रेंनी भाग घेतला. आपल्या खास शैलीत भाषण करताना अत्रेंनी, “मंत्रीमोहोदय म्हणतायेत ते बरोबर आहे. आपल्या राज्यात खरोखर दारुबंदी झाली आहे. त्यांनी मला नुसतं बाटलीचं नाव सांगायचा अवकाश, मी लगेच ती बाटली घेऊन विधानसभेत हजर होतो की नाही बघा,” असं विधान केलं. या वाक्यावरुन साभागृहात एकच हशा पिकला. अत्रेंच्या या शा‍ब्दिक कोटीवरुन मंत्रीमोहोदय चिडले. 

मुख्यमंत्र्यांनी, अत्रेंच्या तोंडाला रात्री प्यायलेल्या दारुचा वास येतोय असं म्हटलं अन्…

त्यांनी अत्रेंवर प्रतिहल्ला करताना, “आताच सभागृहातील एका सदस्याने बाटलीचं नाव घ्या आता लगेच ती हजर करतो असं सांगितलं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांच्या घरात आणि गाडीत बाटल्या असाव्यात. एवढंच नाही (त्यांनी) रात्री घेतलेल्या दारुचा वास आम्हाला अजूनही येतोय,” असं म्हणत टोमणा मारला. हा टोमणा मारत त्यांनी आपलं भाषण संपवलं. मात्र या टीकेला अत्रेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

अत्रेंकडून मुख्यमंत्र्यांनाच चेकमेट

अत्रे आपल्या जागेवर उभे राहिले आणि म्हणाले, “अध्यक्ष मोहोदय, माझं नाव न घेता मंत्रीमोहोदयांनी आपल्या भाषणात माझा उल्लेख केला आहे. आपल्याकडे नवऱ्याचं नाव घेताना बायका लाजतात एवढं ठाऊक होतं. असो ते जाऊ देत आता माझ्या गाडीत बाटल्या असल्याचा आणि रात्री अजून उतरली गेली नसल्याचा उल्लेख केला. त्यात मी थोडासा बदल करतो.”

“मी इथे विरोधी पक्षात आहे आणि ते तिथे काँग्रेस पक्षात. आम्हा दोघांमध्ये अंतरही बरंच आहे. योग्य अंतर ठेवा असा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या आमदारांना एवढ्या लांबून माझ्या तोंडाचा वास कसा काय आला ते मला कळलं नाही. बरं सकाळपासून मी त्यांना जवळ घेतल्याचंही मला आठवत नाहीये. मी त्यांना जवळ घेतलं असतं ना तर त्यांना वास येण्याची शक्यता मी नाकारली नसती,” असं अत्रे म्हणाले आणि सभागृह पुन्हा हशा आणि टाळ्यांनी दणाणून गेलं. मात्र यावेळेस हसणाऱ्यांमध्ये सत्ताधारी काँग्रेसचे आमदार आणि नेतेही होते. 

आजही विधानसभेत दारुवरील चर्चा म्हटल्यानंतर अत्रे आणि देसाई यांची जुगलंबंदी अनेकांना आवर्जून आठवते.

FAQ

प्रश्न 1: हा किस्सा कधीचा आहे?

उत्तर: हा किस्सा मुरारजी देसाई मुख्यमंत्री असताना, म्हणजेच त्यांनी दारूबंदी जाहीर केली त्या काळातील आहे.

प्रश्न 2: आचार्य अत्रे यांनी विधानसभेत दारूबंदीवर काय टीका केली?

उत्तर: अत्रे यांनी खास शैलीत म्हटलं, “मंत्रीमोहोदय म्हणतायेत ते बरोबर आहे. आपल्या राज्यात खरोखर दारुबंदी झाली आहे. त्यांनी मला नुसतं बाटलीचं नाव सांगायचा अवकाश, मी लगेच ती बाटली घेऊन विधानसभेत हजर होतो की नाही बघा.”

प्रश्न 3: मुरारजी देसाई यांनी अत्रे यांच्यावर काय टोमणा मारला?

उत्तर: देसाई यांनी म्हटलं, “आताच सभागृहातील एका सदस्याने बाटलीचं नाव घ्या, लगेच हजर करतो असं सांगितलं. त्यांच्या घरात आणि गाडीत बाटल्या असाव्यात. त्यांनी रात्री घेतलेल्या दारुचा वास आम्हाला अजूनही येतोय.”

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp