
Hadapsar Railway Terminal: पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी रेल्वे स्टेशन म्हणून लवकरच एक नवीन टर्मिनल सेवेत येणार आहे. या डिसेंबरअखेरीस या टर्मिनलचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुणे रेल्वे स्टेशनला पर्यायी रेल्वे स्टेशन म्हणून हडपसर रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत याचं काम पूर्ण होऊन या ठिकाणी वरून आठ नवीन गाड्या सुरू होणार आहेत.
हरंगुळ एक्सप्रेससह आठ रेल्वे गाड्या हडपसर टर्मिनल वरून नियोजन करण्यात येत आहे. या टर्मिनलमुळे पूर्व पुण्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. हडपसर टर्मिनल विकसित झाल्यावर या स्थानकावरुन रेल्वे गाड्यांची व प्रवाशांची वाहतूक वाढणार आहे. पुढील काही महिन्यात आणखी गाड्या या स्थानकातून धावणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गंत हे टर्मिनल करण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी साधारणपणे 135 कोटींचा खर्च केला जात आहे. तर, अप आणि डाउन प्लॅटफॉर्मची लांबी 600 मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं येथे 24 डब्यांच्या गाड्याही थांबू शकणार आहात. तसंच, जुन्या मालवाहतूक मार्गांचे रुपांतर, नवीन मालवाहतूक कॉरिडॉर, आधुनिक स्टेशन इमारत, विस्तारित सर्क्युलेटिंग क्षेत्र, पा्र्किंग सुविधा आणि इतर यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
हडपसर टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म 1,2 आणि 3चे काम पूर्ण झाले आहे. लवकरच एक लिफ्ट, एक्सेलेटर, 12 मीटर रुंद फुटओव्हर ब्रिज, रुफ प्लाझा आणि निवासगृह अशा सुविधादेखील असणार आहेत.
FAQ
हडपसर टर्मिनलचे काम कधी पूर्ण होणार आहे?
हडपसर टर्मिनलचे काम डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हडपसर टर्मिनलवर कोणत्या गाड्या सुरू होणार आहेत?
हरंगुळ एक्सप्रेससह एकूण आठ नवीन रेल्वे गाड्या हडपसर टर्मिनलवरून सुरू होणार आहेत. पुढील काही महिन्यांत आणखी गाड्यांची संख्या वाढणार आहे.
हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी किती खर्च होणार आहे?
या प्रकल्पासाठी अंदाजे 135 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
हडपसर टर्मिनलमुळे पुण्यातील प्रवाशांना काय फायदा होईल?
-पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल.
-पूर्व पुण्यातील नागरिकांना जवळून रेल्वे सुविधा मिळेल.
-वाहतूक आणि प्रवासाचा वेळ कमी होईल.
-आधुनिक सुविधांमुळे प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.