
Dhule News: शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. नागपंचमीच्या दिवशी एका सर्पमित्राने नागासमोर केक ठेवून त्याचा वाढदिवस साजरा केला. एवढेच नाही तर त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकून रिल्स तयार केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर संबंधित सर्पमित्राला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
नक्की काय झालं?
ही घटना बोराडी येथील रहिवासी सर्पमित्र राज वाघ याच्याशी संबंधित आहे. माहितीप्रमाणे, राज वाघ याने काही दिवसांपूर्वी गावातीलच एका घरातून नागाचे रेस्क्यू केले होते. त्यानंतर नागपंचमीच्या निमित्ताने त्याने या नागासमोर केक ठेवून वाढदिवस साजरा केला. केक कापताना व नागाला समोर ठेवून खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले.
का झाली अटक?
शिरपूरचे सहायक वनसंरक्षक तसेच बोराडी प्रादेशिक वनक्षेत्रपाल यांनी याबाबत तपास सुरू केला. त्यानंतर रेंज स्टाफ सांगवी व बोराडी यांच्यासह पथकाने कारवाई करत राज वाघ याला ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्पांशी असे प्रयोग करणे, त्यांचा मनोरंजनासाठी वापर करणे किंवा त्यांच्यासोबत व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकणे हा गुन्हा मानला जातो.
सोशल मीडियावर चर्चा
राज वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला जेलबंदही करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. काही जणांनी त्याच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे तर काहींनी ही घटना केवळ अंधश्रद्धा पसरवणारी व वन्यजीवांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Shirpur Snake Birthday Celebration | शिरपूर तालुक्यात नागाचा
वाढदिवस साजरा;पाहा व्हिडिओ
.
.
.#shirpur #snakebirthday #birthdaclebration #viralvideo #zee24taas #marathinews pic.twitter.com/I953sSAYNN— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 17, 2025
वनविभागाने अशा प्रकारच्या घटनांपासून सर्वसामान्यांनी दूर राहावे, साप किंवा इतर कोणत्याही वन्यप्राण्यांशी छेडछाड करू नये, असे आवाहन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.