
नागपूर: : इंदुताई गायकवाड पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी रेजिन आर्ट कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा डॉ. विनिता बनर्जी आणि डॉ. प्रदीप बनर्जी यांनी घेतली. विद्यार्थ्यांना रेजिन आर्टचे विविध तंत्र, रेजिनचे मिश्रण, ओतणे व डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया शिकविण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत अद्वितीय कलाकृती साकारल्या. या कार्यशाळेचे आयोजन डॉ. श्रुती भांबोरे, डॉ. श्रुतिका वणखडे आणि डॉ. करिश्मा शुक्ला यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत नागराळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की अशा सर्जनशील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासास हातभार लागतो. प्रा. डॉ. पल्लवी धोबळे तसेच इतर शिक्षकवर्गांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व कार्यशाळा यशस्वी पार पाडल्याबद्दल संसाधन व्यक्तींचे अभिनंदन केले.
ही कार्यशाळा चेअरमन डॉ. मोहन गायकवाड पाटील सर आणि खजिनदार डॉ. संदीप गायकवाड पाटील सर यांनीही प्रशंसनीय असल्याचे सांगून अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांकडून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक नवे व उपचारात्मक कलाप्रकार शिकल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयाच्या वतीने भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.