
Mumbai Rain Alert Update: महाराष्ट्र महाभयानक पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट आहेत. महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्या आले आहेत अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेजारील राज्यांशी संपर्क साधला आहे.
सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक भागात पाणी साचले आहे. लोक चिंतेत आहेत. प्रशासनाकडून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की गेल्या 2 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट आहेत. महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट आहेत.
अशातच महाराष्ट्र सरकार शेजारील तेलंगणा तसेच कर्नाटक राज्यांशी संपर्क साधत आहे. नांदेडमध्ये खूप पाऊस पडला आहे, ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक लोक तिथे अडकले होते, 206 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे आणि आणखी लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि लष्कराच्या तुकड्या तिथे पोहोचल्या आहेत. मुंबईतही मुसळधार पाऊस पडला आहे आणि 8 ते 10 तासांच्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट आहे.
महाराष्ट्रात पावसामुळे डेंजर स्थिती निर्माण झाली आहे. असे असताना तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातून पाण्याचा विसर्ग झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यामुळे या राज्यांकडून अचानक पाण्याचा विसर्ग होऊ नये म्हणून या राज्यांशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानंतर मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला, जो सुरूच आहे. अशा परिस्थितीत, हवामान खात्याने पुढील 24 तासांत पुण्यात अति मुसळधार पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. इतकेच नाही तर पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगरे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.