
Nagpur Tanha Pola Festival : देशात प्रत्येक राज्यात आपली एक अशी प्रथा आणि परंपरा आहे. सध्या सर्वत्र सणांचा उत्साह आहे. गणेशोत्सवाची लगबग देशभरात दिसून येत आहे. श्रावण अमावस्येला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बैल पोळा साजरा करण्यात येतो. शेतकऱ्यांसाठी हा सण अतिशय खास असतो. बैलाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. हा सण खास करुन विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात साजरा करण्यात येतो. त्यासोबत विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. बैल पोळ्याचा दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परपंरा आहे. (Maharashtra Nagpur Tanha Pola Vidarbha Festival Traditional Festivals )
काय आहे तान्हा पोळ्याची परंपरा?
तान्हा पोळा हा सण महाराष्ट्रातील काही ठराविक भागातच साजरा करण्यात येत असून या सणाला शेकडो वर्षांची मोठी परंपरा आहे. तान्हा पोळा हा सण विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा हा सण लक्षवेधी असतो. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं पोळ्याचा सण साजरा केला जातोय. ही परंपरा गेल्या 217 वर्षांपासून आजही सुरू आहे.
विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही. 1789 मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांनी हा उत्सव सुरु केला. लहान बालगोपालांना बैलाचे महत्व कळावे. म्हणून तान्हा पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांनी लाकडी बैल तयार करून मागविले आणि सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले. जिवंत बैलाप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळं, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे, अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात यायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात यायचे.
या प्रथेला 235 वर्षे पूर्ण झाले आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. आज सुद्धा एवढा मोठा बैल भोंसले घराण्याकडे आहे. मुधोजीराजे यांच्या निवासस्थानी, सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आहे. या लाकडी बैलांची उंची आठ फूट लांबी सहा फूट असून या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे.
तान्हा पोळा कसा साजरा करण्यात येतो?
या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवल्या जातो. तो परिसर फुगे, तोरण, पताका लावुन सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात. नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्याकारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केल्या जातो. त्यानंतर मुलांना काकडी आणि खोबऱ्याचा प्रसाद वाटप केल्या जाते. आणि पोळा फुटला असे जाहीर केल्या जाते.
या उत्साहाला संस्कृती आणि स्पर्धेची झालर लागली आहे. अनेक पालक आपल्या मुलाला वेगवेगळ्या वेशभुषांमध्ये सजवुन आणतात. पोळा फुटायच्या आधी या सगळ्या छोट्या मुलांचे वेशभुषा निरीक्षण केले जाते. तसेच त्यांनी सजावुन आणलेल्या बैलाचे निरीक्षण केले जाते. पोळा फुटल्यानंतर उत्तम वेशभुषा आणि बैलाची उत्तम सजावट केलेल्या मुलांना क्रमांका प्रमाणे नंबर देऊन, त्यांना योग्य ते पारितोषिक दिल्या जातात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.