
Maraatha Aarakshan : मराठा समाजासाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे. या राज्य मंत्रिमंडळ उपसमितीचे नवे अध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील असणार आहेत. मागील शिंदे सरकारच्या काळात, 4 ऑक्टोबर 2022 रोजी स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते. पाटील यांच्या जागी आता विखे-पाटील यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. (Big news Maratha community The government has taken an important decision maraatha aarakshan mantrimandal upasamiti)
मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि इतर विषयांवर शिफारसी करण्यासाठी सरकारने कॅबिनेट उपसमितीची पुनर्रचना केली आहे. या कॅबिनेट उपसमितीत एकूण 12 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात एक सरकारी आदेश जारी केला आहे. मराठा आरक्षणासाठी प्रशासकीय आणि कायदेविषयक कामांचे समन्वय साधण्याची जबाबदारी कॅबिनेट उपसमितीला देण्यात आली आहे. यासोबतच, कॅबिनेट उपसमिती मराठा आंदोलक आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करेल. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती ती ठरवेल. ही समिती मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी काम करणार आहे.
संदीप शिंदे समितीशी समन्वय साधून कामकाजातील अडचणी दूर कराव्या लागतील. तसंच, जात प्रमाणपत्र देण्यातील अडथळे दूर करावे लागतील. याशिवाय, मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या विविध योजना, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनांचा आढावा ही समिती घेईल. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, राज्याचे पर्यटन मंत्री शुंभराज देसाई, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील), राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा कॅबिनेट उपसमितीचे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
FAQ
1. मंत्रिमंडळ उपसमितीचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
मंत्रिमंडळ उपसमितीचे नवे अध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील असतील.
2. या उपसमितीत किती मंत्र्यांचा समावेश आहे?
या कॅबिनेट उपसमितीत एकूण 12 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
3. कॅबिनेट उपसमितीच्या जबाबदाऱ्या काय आहेत?
उपसमिती मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी शिफारसी करेल, मराठा आंदोलकांशी चर्चा करेल, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी ठरवेल, आणि आरक्षणासाठी प्रशासकीय-कायदेविषयक समन्वय साधेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.