
Sadabhau Khot: भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी सांगोल्यात गोरक्षकांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळं सदाभाऊ विरुद्ध गोरक्षक असा संघर्ष सुरु झालाय. सोलापुरातील गोरक्षकांनी सदाभाऊ खोत हे कसायांचे दलाल असल्याचा आरोप केलाय. गोरक्षकांना खंडणीखोर म्हणणा-या सदाभाऊंनी पुरावे द्यावे असं आव्हानंही त्यांनी केलंय. दुसरीकडं मस्त्य व बंदर विकासमंत्री नितेश राणेंनीही सरसकट गोरक्षकांविरोधात विधानं नकोत असंही सांगितलंय.
भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगोल्याच्या मोर्चात गोरक्षकांविरोधात थेट भूमिका घेतली.. गोरक्षक शेतक-यांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढंच नव्हे तर धमक्या देणा-या गोरक्षकांना त्यांनी गावरान भाषेत नांगरही दाखवला.
सदाभाऊ खोतांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले… सोलापुरातील गोरक्षकांनी सदाभाऊ खोत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये. सदाभाऊ खोत हे कसायांचे दलाल असल्याचा आरोप गोरक्षकांनी केलाय. सदाभाऊ खोतांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी गोरक्षकांनी केलीय.
सदाभाऊंनी गोरक्षकांबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्येही ते एकाकी पडलेत. भाजप नेते आणि मस्त्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणेंनी सदाभाऊंनी सरसकट सगळ्याच गोरक्षकांवर आरोप करु नये असा सल्ला दिलाय.
शेतकरी नेते अशी सदाभाऊ खोत यांची ओळख. त्यांनी शेतकरीधार्जिणी भूमिका घेतली ती त्यांच्या पक्षात कितपत मान्य होईल याबाबत शंका आहे. पण येत्या काळात गोरक्षक विरुद्ध सदाभाऊ खोत असा संघर्ष रस्त्यावरही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
FAQ
प्रश्न: सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांविरोधात कोणती भूमिका घेतली आणि त्याला कोणता प्रतिसाद मिळाला?
उत्तर: भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगोल्यातील शेतकरी मोर्चात गोरक्षकांवर टीका करत त्यांना शेतकऱ्यांना त्रास देणारे आणि खंडणीखोर ठरवले. त्यांनी गावरान भाषेत गोरक्षकांना धमक्याही दिल्या. यावर सोलापुरातील गोरक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत खोत यांना कसायांचे दलाल म्हणत त्यांच्या आमदारकीचा राजीनामा मागितला आणि पुरावे देण्याचे आव्हान दिले.
प्रश्न: सदाभाऊ खोत यांच्या गोरक्षकविरोधी वक्तव्यावर भाजपमधील प्रतिक्रिया काय आहे?
उत्तर: सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर भाजपमध्येही नाराजी आहे. मस्त्य आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी खोत यांना सल्ला दिला की, सरसकट सर्व गोरक्षकांवर आरोप करू नयेत. यामुळे खोत पक्षात एकाकी पडले आहेत, कारण त्यांची शेतकरीधार्जिणी भूमिका पक्षाच्या मुख्य प्रवाहाशी विसंगत आहे.
प्रश्न: या वादामुळे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात?
उत्तर: सदाभाऊ खोत यांच्या गोरक्षकविरोधी टीकेमुळे सोलापूर आणि सांगलीत तणाव वाढला आहे. गोरक्षकांनी खोत यांच्याविरुद्ध आंदोलनाची तयारी दर्शवली आहे, तर खोत यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे येत्या काळात गोरक्षक आणि खोत यांच्यात रस्त्यावरही संघर्ष होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम महायुतीच्या राजकीय एकजुटीवर होऊ शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.