
Pune News : पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. शहरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियनंतर पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कोवळ्या वयात बहीण भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक आई वडिलांची मायेची सावली हरपल्यामुळे पोरके झालेल्या या बहीणभावची व्यथा ऐकून डोळे पाणावतात. (Pune News Couple die after liver transplant brother and sister reaction on Hospital laziness)
आता आम्ही जगायचं कसं?
हो, हा प्रश्न विचारत आहे, आई वडिलांचे हरपलेला असाह्य आणि लहान बहिणीची जबाबदारी आलेला हा तरुण मुलगा…शिक्षक सुरु असताना आधी वडिलांचं निधन झालं आणि 8 दिवसांमध्ये आई पण जग सोडून निघून गेली. आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न हे भावंड विचारत आहे.
पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये क्रिएटिन कमी झाल्यामुळे बापू बाळकृष्ण कोमकर यांना दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करताच आपल्याला बापू यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी उद्याच ऑपरेशन करावे लागले, असं सांगितलं. अशात पत्नी कामिनी बापू कोमकर यांनी पतीचे प्राण वाचविण्यासाठी आपण लिव्हर देणार असा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सांगितलं की, लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर बापू यांचं जीव वाचलेच असं नाही. पण हो, जो लिव्हर देणार आहे, त्याचा जीवाला धक्का नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, असं कोमकर यांच्या मुलाने सांगितलं.
गेल्या आठवड्यातील बुधवारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर बापू बाळकृष्ण कोमकर यांच्या दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी मृत्यू झाला. त्यातून कुटुंब कसंबसं सावरतच होतं की, 8 दिवसांनी पत्नी आणि या भावंडांची आई यांचा अचानक मृत्यू झाला. वडिलांच्या ऑपरेशनसाठी अनेक जणांकडून कर्ज घेऊन वडिलांच्या जीव वाचविण्यासाठी या बहीण भावाने धडपड केली होती. पण शस्त्रक्रियेनंतरही वडिलांचा जीव वाचला नाही. आता आईकडे बघून मुलांनी धीर धरला होता. पण आईची सावली पण या दोघांच्या डोक्यावर सरकली आणि क्षणात ही पोर पोरकी झाली.
आई वडिलांनी जग सोडल्यानंतर आता लहान बहिणीची जबाबदारी अंगावर पडली आहे. बापू कोमकर यांच्या मुलगा म्हणाला की, मी अजून शिक्षण घेत आहे, या ऑपरेशनसाठी अनेक जणांकडून कर्ज घेतले, ना मामा आहे, ना काका आता आम्ही जगायचं तरी कसं? हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. हॉस्पिटलची लोक आमचं पालन पोषण करणार हा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.