
झी 24 तास वाहिनीमार्फत पुण्यात “कृषी सन्मान’ सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्याचा आणि कृषीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यवसायिकांचा आणि मातीत राबून निरनिराळे प्रयोग करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
मान्यवरांची नावे
राजारामबपू पाटील सहकारी साखर कारखाना लि. चे मालक विजय बळवंतराव पाटील यांना ‘सर्वोत्कृष्ठ पुनरुत्पाजक शेती व ऊस विकास गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
तापी बायो फर्टिलायझर कंपनीचे संचालक ईश्वरलाल जैसवाल यांना बायो फर्टिलायझरमध्ये उत्पादनात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले आहे.
जे. के. हायटेक उस रोपवाटिका, पेठनाका-फलटणचे निर्माते पांडुरंग माळी यांना महाराष्ट्रात रोपवाटिरेत सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे.
ध्रुव प्रतिष्ठानचे संचालक राजीव केळकर यांना शेती अवजार पेढी, शेतकरी मदत, शेतकरी मुलांचे शिक्षण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जीएनपी ऍग्रो सायन् प्रा.लि. नाशिकचे एमडी गौतम नामदेवराव पाटील यांना ऍग्रो केमिकलमध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
क्रेंटा केमिकल आणि फर्टिनायझर प्रा.लि.चे संचालक राजाराम येवले यांना फर्टिलायझर आणि केमिकल क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आलं.
श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल मरगजे यांना खडकाळ मुरमाड जमिनीवर यशस्वी बागायत शेतीचा अनोखा अविष्कार दाखवल्याबद्दल गौरविण्यात आले.
एसकेआर ग्रुपच्या श्रीकांत राठी यांना देखील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पावर आणि ऍग्रो प्रोसेसिंग लि.चे चेअरमन यांना ऍग्रो कोऑपरेटिवक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आलं आहे.
अशोक ऍग्रिक्लचरल बोरवेल स्टिम्युलेशन सर्विसचे संस्थापक विशाल बागले यांना बोअरवेल रासायनिक उत्तेजना उपचारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले.
ग्रीन गोल्ड सिड्स प्रा.लि अजित मुळे यांना बियांच्या उत्पादनात सर्वोत्कृष्ठ कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं.
प्रतिक हायटेक नर्सरीचे संस्थापक श्रीकांत मोरे यांना भाज्यांच्या नर्सरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आलं.
एमआयपीए इंडस्ट्री पुण्याचे संस्थापक प्रकाश रीजाल यांना कृषी उपायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर सन्मान देऊन गौरविण्यात आलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



