
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis: मनोज जरांगे यांच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरबाजीने उत्तर देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो, शिव्यांना नाही अशा आशयाचे बॅनर लावत जरांगे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.
मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत धडकणार आहेत. दरम्यान त्यापूर्वीच भाजप नेत्यांनी मनोज जरांगेंविरोधात मोर्चा उघडलाय. भाजपनं जरांगेंविरोधात बॅनरबाजी केली आहे. जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांच्या आईसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्याच वक्तव्यावरून आता भाजपनं जरांगे पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो शिव्यांना नाही अशा आशयाचे बॅनर भाजपकडून लावण्यात आले आहेत.
‘काही लोक फडणवीसांच्या कुटुंबाबत गलिच्छ बोलतात’
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील नाव न घेता मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनाच का टार्गेट केलं जातंय? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच त्यांच्या कुटुंबासंदर्भात गलिच्छ वक्तव्य केली जातायत. त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नसल्याचं बावनकुळे
यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांबाबत बोलताना मनोज जरांगे यांची जीभ घसरली
मुंबईकडे कूच करण्याआधी बीडमध्ये जरांगे पाटलांनी इशारा सभा घेतली होती. दरम्यान यासभेत त्यांनी फडणवीसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी आताच्या आंदोलनात देखील फडणवीसांनाच टार्गेट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजप नेते देखील जरांगे पाटलांविरोधात आक्रमक झाले आहेत. जरांगे मुंबईत धडकण्याआधीच भाजपनं जरांगे पाटलांना बॅनरबाजीच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
FAQ
1. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भाजपने बॅनरबाजीने कसे उत्तर दिले आहे?
भाजपने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत, ज्यामध्ये “इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, शिव्यांना नाही” असा मजकूर आहे. हे बॅनर मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून लावण्यात आले आहेत.
2. मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांबद्दल कोणते वादग्रस्त वक्तव्य केले?
बीड येथील एका सभेत मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, ज्यामुळे भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे यांनी नंतर हे वक्तव्य मागे घेतले आणि कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागितली, परंतु त्यांनी फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणात अडथळे आणल्याचा आरोप कायम ठेवला.
3. भाजप नेत्यांनी जरांगे यांच्या वक्तव्याला कसा प्रतिसाद दिला?
चंद्रशेखर बावनकुळे (महसूलमंत्री): त्यांनी जरांगे यांचे नाव न घेता फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबावर गलिच्छ वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे म्हटले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की फडणवीस यांनाच का नेहमी टार्गेट केले जाते?
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.