
अमरावती विमानतळावरून नवीन मार्गांसाठी हौशी पर्यटक मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी खासदार बळवंतराव वानखडे आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे.
.
सध्या अमरावती विमानतळावरून आठवड्यातून दोनदा अलायन्स एअरलाइन्सचे विमान धावते. मात्र २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ही सेवा बंद होती. त्यामुळे भविष्यात विमानसेवा पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमरावतीतून मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी जातात. तसेच बंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक जण आहेत. अंदमान आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या पर्यटकांसाठीही या मार्गांची आवश्यकता आहे. व्यापाऱ्यांसाठी अहमदाबाद मार्गाचीही मागणी करण्यात आली आहे.
अमरावतीसह अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या परिसरातील प्रवाशांनाही या विमानसेवेचा लाभ मिळू शकतो. विशेषतः चिखलदरा येथे होणाऱ्या जागतिक दर्जाच्या स्कायवॉकमुळे येणाऱ्या पर्यटकांसाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे.
निवेदन सादर करताना रामेश्वर अभ्यंकर, भूषण बनसोड, रश्मी नावंदर यांच्यासह हौशी पर्यटक ग्रुपचे प्रमुख विजय शिंदे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.