
Extra Holiday Next Week: राज्य सरकारने मागील महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा आणि दहीहंडीनिमित्त दोन सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. या महिन्यातही राज्यभरात एक अतिरिक्त सुट्टी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही सुट्टी पुढल्या आठवड्यात म्हणजेच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. या सुट्टीसंदर्भात निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पुढल्या आठवड्यात नेमकी कसली सुट्टी मिळण्याची शक्यता आहे आणि हा काय प्रकार आहे जाणून घेऊयात…
नेमकी कसली सुट्टी?
या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी राज्यभर श्रीगणेश विसर्जन आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी मुस्लीम समाजासाठी पवित्र असलेला ‘मोहम्मद पैगंबर’ यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी जुलूस काढला जातो. या शोभायात्रेला ‘ईद -ए-मिलादुन नबी’चा जुलूस असं म्हणतात. मात्र हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या दुष्टीने अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी हा जुलूस काढण्याऐवजी हा जुलूस सोमवारी काढला जाणार आहे. त्यामुळेच सोमवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोणी केली आहे मागणी?
‘ईद -ए-मिलादुन नबी’चे जुलूस 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याने या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
…तर सोमवारी सुट्टी
हिंदु -मुस्लीम एकोपा अबाधित राहावा या उद्देशाने विविध मुस्लीम संघटनांची ‘ऑल इंडिया खिलाफत कमिटी’ची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जन्मदिनी काढण्यात येणारा जुलूस शुक्रवारऐवजी सोमवारी 8 सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. या निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होणार आहे, असे आमदार शेख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का? हे पहावे लागणार आहे. खरोखरच यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्यास राज्यात सोमवारीची सुट्टी जाहीर केली जाईल.
FAQ
महाराष्ट्रात सप्टेंबर 2025 मध्ये कोणती अतिरिक्त सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे?
महाराष्ट्रात 8 सप्टेंबर 2025 रोजी ‘ईद-ए-मिलादुन नबी’ जुलूसानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही सुट्टी मुस्लिम समाजासाठी पवित्र असलेल्या पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त काढल्या जाणाऱ्या जुलूसासाठी प्रस्तावित आहे.
कोणी सुट्टीची मागणी केली आहे?
समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 8 सप्टेंबर 2025 रोजी ‘ईद-ए-मिलादुन नबी’ जुलूसानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सुट्टीच्या मागणीमागील कारण काय आहे?
हिंदू-मुस्लिम समुदायांमध्ये शांती आणि एकोपा कायम राहावा यासाठी ‘ऑल इंडिया खिलाफत कमिटी’च्या बैठकीत जुलूस 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या जुलूसाला शासकीय मान्यता मिळावी आणि सर्वांना सहभागी होता यावे यासाठी सुट्टीची मागणी करण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.