
दर्यापूर येथील स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दैनंदिन उपचारासाठी येणारे बाह्यरुग्ण तसेच दाखल होणाऱ्या इतर रुग्णांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. हा प्रशासकीय अनास्थेचा प्रकार आहे. त्यामुळे प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या दिरंगाईबाबत शिवसेना (उबाठा)
.
यावेळी त्यांनी जनरल वार्ड, रुग्णालयाच्या किचनसह संपूर्ण परिसराची पाहणी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अक्षरक्ष: काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाने नियुक्त केलेले डॉक्टर, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाहीत. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णसेवा प्रभावीत होत आहे. यंत्रणा उपलब्ध असतानाही गरोदर महिलांना सीझरसाठी अमरावती का पाठविले जाते, रुग्णांना तपासणीअंती पुरेशा औषधी का दिल्या जात नाहीत आदी प्रश्न यावेळी विचारण्यात आले.
शालेय अंगणवाडी पथकात असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्यांचे मूळ काम करु न देता ओपीडीमध्येच काम करुन घेतल्याचे चित्र आहे. नवजात शिशूकरिता बेड उपलब्ध असतानाही त्यांची गैरसोय होते, लॅबमध्ये सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या नियमित केल्या जात नाहीत. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया दर आठवड्याला करणे बंधनकारक असताना तसे नियोजन नाही. ऑपरेशन थिएटरची दूरवस्था व रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. एक्सरे, सोनोग्राफी व ईसीजी मशनरी उपलब्ध असताना रुग्णांना सुविधा दिली जात नाही आदी मुद्दांवरही वैद्यकीय अधीक्षक डॉ.गुणवंत जढाळ यांना जाब विचारण्यात आला. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख अलका पारडे, उपजिल्हाप्रमुख वर्षा धोंडे, शिवसेना विधानसभा समन्वयक बबन विल्हेकर, युवासेना तालुकाप्रमुख सागर गिरे, युवासेना शहर प्रमुख रुपेश मोरे, किशोर टाले, तालुका समन्वयक गुणवंत गावंडे, प्रशांत धर्माळे, सतीश जामनिक, मंगेश धुराटे, मंगेश पारडे, नितीन माहूरे, दीपक बगाडे, अजय शेलार, रामसिंग साळुंखे, विनोद काकडे आदींची उपस्थिती होती.
त्या मुद्द्यावर कारवाईचे आमदारांचे निर्देश
रुग्णांच्या जेवणात निघालेल्या अळ्या व सोंडे याप्रकरणी ठोस उपाययोजना करीत संबंधितांवर कारवाई करण्याच्या सुचना आमदार गजानन लवटे यांनी डॉ. जढाळ यांना दिल्यात. तर दुसरीकडे येत्या आठ दहा दिवसात रुग्णालय प्रशासनाने सुधारणा न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर यांनी दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.