
Royal Enfield Village in Maharashtra : धडधडत जाणारी बुलेट, अर्थात रॉयल एनफिल्ड कंपनीची ही अफलातून बाईल पाहिली की नजर आपोआपच तिच्यावर खिळते. त्यातही या बुलेटचं मॉडेल जुनं असेल आणि समोरचा माणूस बाईकप्रेमी असेल तर विचारूनच सोय नाही. दमदार, वजनदार आणि रुबाबदार दुचाकीवर प्रेम करणाऱ्यांसाठी रॉयल एनफिल्ड कंपनी आणि त्यांची बुलेट म्हणजे एक अनोखी परवणीच. अशा या बुलेटला रस्त्यावर आणि बाईकप्रेमींच्या मनातच नव्हे, तर महाराष्ट्रातील एका गावात मानाचं स्थान आहे.
घरपट्टीस एक बुलेट…
बुलेट ही हल्ली अनेकांकडे असली तरीही महाराष्ट्रातील (Sangli News) सांगलीमध्ये असणाऱ्या बेडग या गावामध्ये फक्त आणि फक्त बुलेटच दिसतात. प्रत्येक घरात इथं एक किंवा त्याहून जास्त बुलेट असून इथं या दुचाकीकडे गावकरी वाहन नव्हे तर अभिमान आणि रुबाबाची गोष्ट म्हणूनही पाहतात. रॉयल एनफिल्डच्या बुलेटमुळं या गावाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. साधारण 17000 लोकसंख्या असणाऱ्या या गावात 3500 कुटुंब राहतात असं आकडेवारी सांगते.
बेडग गावातील तरुण बुलेट रायडिंग क्लब चालवतात, अनेकांना बुलेट चालवायलाही शिकवतात. तरुणच नव्हे, तर गावातील तरुणींनासुद्धा बुलेटचा नाद आहे बरं. गावाबाहेर पडतानाही इथली मंडळी त्यांची बुलेट विसरत नाहीत बरं. शिकण्यासाठी किंवा इतर काही कारणानं गावाबाहेर गेलं असतानाही ही मंडळी बुलेट सोबत घेऊन जातात.
असं सांगतात की सुरुवातीच्या काळात हे गाव दुष्काळग्रस्त होतं. पण, गावात पाणी आलं आणि पाहता पाहता गावाचा कायापालट झाला. गावात सुबत्ता आली आणि सोबतच आली ती म्हणजे बुलेट. लहानातील लहान काम असो किंवा सणावाराला मिरवायचा रुबाब असो, ही बुलेट दिसल्यावाचून गावात एकही दिवस जात नाही. म्हणूनच की काय महाराष्ट्रातील असंख्य गावांमध्ये सांगलीतील हे बेडग गाव त्याचं वेगळेपण जपून आहे. त्यामुळं कधी या मार्गानं प्रवास झाला, तर या बुलेटच्या गावाला नक्की भेट द्या.
FAQ
बेडग गाव कुठे आहे आणि त्याची खासियत काय आहे?
बेडग गाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे. या गावाची खासियत म्हणजे येथील प्रत्येक कुटुंबाकडे किमान एक रॉयल एनफिल्ड बुलेट आहे, ज्यामुळे गावाला “बुलेट गाव” म्हणून ओळख मिळाली आहे.
बेडग गावात किती लोकसंख्या आहे?
बेडग गावात अंदाजे 17,000 लोकसंख्या असून सुमारे 3,500 कुटुंबे राहतात.
गावातील लोकांमध्ये बुलेट का लोकप्रिय आहे?
बुलेट ही गावकऱ्यांसाठी केवळ वाहन नसून अभिमान, रुबाब आणि जीवनशैलीचा भाग आहे. गावात सुबत्ता आल्यानंतर बुलेटचा वापर वाढला आणि ती गावाच्या संस्कृतीचा भाग बनली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.