
Marashtra weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार भारतातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी असेल. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा इथं पाऊस थैमान घालताना दिसेल. तर, जम्मू काश्मीरमध्येसुद्धा पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
फक्त देशाच्या उत्तरेकडेच नव्हे, तर बंगालच्या उपसागरामध्ये नव्यानं निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच पुन्हा एकदा पाऊस दुप्पट तीव्रतेनं सक्रिय झाला आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान IMD च्या निरीक्षणानुसार उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी गतिविधी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर, राज्याच्या इतर भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 5 सप्टेंबरला, राज्यात पावसाचा जोर तुलनेनं अधिक असेल असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं असून, राज्यात सणांचा काळ असल्यानं नागरिकांनाही यादरम्यान सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उद्या आणि परवासाठी पावसाचे इशारे…
By, @RMC_Mumbai @imdnagpur https://t.co/133BjXmjKL pic.twitter.com/vTTo1xNGpJ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2025
राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा अलर्ट?
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर (प्रामुख्यानं घाटमाथा) या भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट अर्थात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरींची हजेरी असेल ज्यामुळं तेथील जिल्ह्यांना यलो अलर्ट देत सतर्क करण्यात आलं आहे.
FAQ
महाराष्ट्रातील कोणत्या भागांना किती धोका?
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात 4 ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कुठं इशारा?
(ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक):अलर्ट: ऑरेंज अलर्ट
पाऊस: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह.
सतर्कता: दक्षतेचा इशारा, घाटमाथ्यावर विशेष काळजी घेण्याचे आवाहन.
मराठवाडा आणि इतर उत्तर महाराष्ट्रातील भागांसाठी कोणता इशारा?
अलर्ट: यलो अलर्ट
पाऊस: मध्यम स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जनेसह.
सतर्कता: सामान्य सतर्कता बाळगण्याचे निर्देश.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.