
Bhiwandi Crime News: भिवंडीत एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. पत्नीचे डोके कापून खाडीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इतकंच नव्हे तर, आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आहे. याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
भिवंडीत 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ईदगाह रोड झोपडपट्टी, कत्तलखान्या जवळील खाडीत महिलेचे कापलेले डोके आढळल्याने संपूर्ण परिसरात घबराट आणि खळबळ उडाली होती. मृताचे वय सुमारे 25 ते 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येतेय. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. त्यानंतर डोके शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
पोलिस तपास आणि खुलासा तपासादरम्यान, महिलेची ओळख पटली असून तीच नाव परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद ताहा अन्सारी असल्याचं पोलिसांना समजले. मयताची ओळख तिच्या आईने केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी तिचा पती मोहम्मद ताहा उर्फ सोनू इम्तियाज अहमद अन्सारी (25 वर्षे) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची आणि तिचे तुकडे केल्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिली.
भोईवाडा पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 11 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघा पती-पत्नींमध्ये खूप भांडणं होत होती. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन सतत वाद होत होते. या भांडणातूनच पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी 103,238 अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.
FAQ
1. भिवंडीत कोणती खळबळजनक घटना घडली आहे?
भिवंडीतील ईदगाह रोड झोपडपट्टी परिसरात 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी एका महिलेचे कापलेले डोके खाडीत आढळल्याने खळबळ उडाली. पोलिस तपासात या महिलेची हत्या तिच्या पतीने केल्याचे उघड झाले असून, तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते खाडीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2. मृत महिलेची ओळख काय आहे?
मृत महिलेची ओळख परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद ताहा अन्सारी अशी झाली आहे. तिच्या आईने तिची ओळख पटवली. मृताचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.
3. या हत्याकांडाचा आरोपी कोण आहे?
या प्रकरणात मृत महिलेचा पती, मोहम्मद ताहा उर्फ सोनू इम्तियाज अहमद अन्सारी (25 वर्षे), याला मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



