
Anjali Damania on Amol Mitkari: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचा फोन कॉल व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केली आहे. अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहून अंजली कृष्णा यांच्या शैक्षणिक, जात आणि इतर कागदपत्रांबाबत शंका असून, त्यांची तपासणी करावी अशी मागणी केली आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या असून त्या IPS ऑफिसरना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन असा इशाराच दिला आहे.
अंजली दमानिया यांनी एक्सवर अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे. “हा काय फालतूपणा आहे ? अमोल मिटकरींनी त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, की स्वतःचे डोकं वापरले? अंजना कृष्णाची चौकशी? का? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून?,” अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे.
आयपीएस बनतांना देशासाठी काहीतरी करू ही भावना असते.
अंजना कृष्णा ला वाटलं मी हे सगळं अवैध काम, गुंडगिरी बंद करेन. तिला कुठे माहिती की ह्या गुंडांना वर बसलेला एक बाप असतो, आणि जर कोणी त्यांचे काम थांबवले तर अशा प्रत्येकाला टारगेट केले जाते.
हेच कारण आहे की आपल्या तहसीलदार,… https://t.co/PM4HSynsQ1
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 5, 2025
“चौकशी त्या अजित पवारची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांनमधे अजित पवारच्या कब्जात आहेत त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत. ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत,” अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे.
“त्या आयपीस अधिकाऱ्यांना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन. IPS अधिकाऱ्यांचे बूट पुसण्याची लायकी नसते या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.
“आयपीएस बनताना देशासाठी काहीतरी करू ही भावना असते. अंजना कृष्णाला वाटलं मी हे सगळं अवैध काम, गुंडगिरी बंद करेन. तिला कुठे माहिती की ह्या गुंडांना वर बसलेला एक बाप असतो, आणि जर कोणी त्यांचे काम थांबवले तर अशा प्रत्येकाला टार्गेट केले जाते. हेच कारण आहे की आपल्या तहसीलदार, कलेक्टर, एसपी, कुणकुणामध्ये हिंमत राहत नाही ह्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
कोण आहेत अंजना कृष्णा?
अंजना कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजना कृष्णा व्हीएस आहे. त्या भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी आहेत, ज्या सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलिस उपअधीक्षक (DSP) म्हणून कार्यरत आहेत. आपल्या प्रामाणिक आणि कठोर कार्यशैलीसाठी त्या ओळखल्या जातात. 2022-23 मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी AIR-355 रँक मिळवला होता.
अंजना कृष्णा यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे, तर आई सीना कोर्टात टायपिस्ट म्हणून काम करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून आणि उच्च शिक्षण तिरुअनंतपुरम येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमनमधून झाले. अंजना कृष्णा यांची गणना कुशाग्र आणि प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.
नेमकं काय झालं?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यादरम्यान नागरिक आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवारांचा आवाज ओळखता आला नाही. अजित पवारांनी यावेळी दोनवेळा मी उपमुख्यमंत्री बोलत आहे असं सांगितलं. ‘मै DCM बोल रहा हू. ‘ये कारवाई बंद करो…मेरा आदेश हैं..’, असं अजित पवारांनी सांगितलं. त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या, “मेरे फौन पर कॉल करे”. त्यावर अजित पवार रागावून म्हणले की, “तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पेहचानोगा ना”.
यानंतर अजित पवारांनी व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर अंजना कृष्णा यांनी बांधावर जाऊन पवारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. माझा फोन आला आहे, तहसीलदारांना सांगा असं पवार म्हणाले.
FAQ
1) अंजना कृष्णा कोण आहेत?
अंजना कृष्णा या 2023 बॅचच्या भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी आहेत, ज्या सध्या सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलिस उपअधीक्षक (DSP) म्हणून कार्यरत आहेत. त्या केरळमधील तिरुअनंतपुरम येथील असून, त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2022 मध्ये AIR-355 मिळवला. त्या त्यांच्या प्रामाणिक आणि कठोर कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात.
2) अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातील वाद काय आहे?
2025 मध्ये सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरुद्ध कारवाई करताना अंजनाकृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडीओ कॉलवर वाद झाला. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कार्यकर्ते बाबा जगताप यांनी अजित पवारांना फोन लावून अंजना यांना दिला. अंजना यांना पवारांचा आवाज ओळखला नाही आणि त्यांना त्यांचा नंबर देऊन कॉल करण्यास सांगितले, ज्यामुळे पवार संतापले आणि त्यांनी “इतनी डेरिंग है तुम्हारी?” असे म्हणत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
3) हा वाद कशामुळे उद्भवला?
अंजना कृष्णा यांनी स्थानिक तक्रारींवरून कुर्डू गावात रस्त्याच्या बांधकामासाठी होणाऱ्या अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. गावकऱ्यांनी आणि NCP कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. बाबा जगताप यांनी अजित पवारांना फोन लावला, ज्यांनी अंजली यांना कारवाई थांबवण्यास सांगितले. अंजली यांनी पवारांची ओळख निश्चित करण्यासाठी त्यांना थेट कॉल करण्यास सांगितले, ज्यामुळे वाद वाढला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.