
पुण्यातील नाना पेठेत गँगवारची धक्कादायक घटना घडली आहे. वनराज आंदेकर टोळीतील मुख्य आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. गोविंद कोमकर या 19 वर्षीय मुलावर आंदेकर टोळीने तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गोविंद कोमकर या तरुणाचा मृत्यू झाला
.
एका ठिकाणी रेकी अन् दुसऱ्या जागी खून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात श्री लक्ष्मी हाऊसिंग सोसायटीतील इमारतीच्या पार्किंगमध्ये शनिवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास झालेल्या खुनी हल्ल्यात वनराज आंदेकर टोळीतील मुख्य आरोपी गणेश कोमकरच्या १९ वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृताचे नाव गोविंद कोमकर असे असून त्याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
मागील वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत वनराज आंदेकर यांचा गोळीबार आणि कोयता हल्ला करून खून करण्यात आला. या प्रकरणात बहिणीचा दीर गणेश कोमकर हा मुख्य आरोपी आहे. या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गोविंद कोमकर याला लक्ष्य केल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. विशेष बाब म्हणजे टोळीने रेकी एका भागात केली व प्रत्यक्ष लक्ष्य दुसऱ्या ठिकाणी साधले. त्यामुळे पोलिसांनाही गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा झाला असून खून रोखण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना अपयश आले आहे.
या हल्ल्यानंतर नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून गुन्हे शाखेकडून या खुनाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचा मृतदेह ताब्यात घेवून ससून रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठवला आहे. दोन दिवसांपूर्वीच आंदेकर टोळीचा गॅंगवॉरचा प्रकार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी उघडकीस आणत आठ जणांची नावे निष्पन्न करून दत्तात्रय काळे या आरोपीला अटक केली. अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेला असतानाच सदर खूनाची घटना झाल्याने खळबळ उडाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.