
Smart City Nagpur : नागपूरकरासांठी आनंदाची बातमी आहे. अत्याधुनिक आणि तंत्रस्नेही स्वरूपाचे नवीन नागपूर वसवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आज नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA आणि हुडको, NBCC यांच्यात करार करण्यात आला आहे. नवीन नागपूरसाठी NBCCप्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार आहेत. तर 1710 एकरमध्ये नवीन नागपूर विकसित होणार आहे. 148 किमीचा नागपूर आऊटर रिंगरोड उभारला जाणार आहे. तर हुडको 11,300 कोटी रुपये देणार असून यातील 6500 कोटी नवीन नागपूरसाठी, तर 4800 कोटी आऊटर रिंगरोडसाठी देणार आहेत. तर एनबीसीसी विकास करणार आहेत.
नवीन नागपूर काय आहे प्रकल्प?
‘नवीन नागपूर’ हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचाद्वारे संकल्पित करण्यात आला असून एनएमआरडीएच्या हद्दीत हे शहर असणार आहे. यात स्टार्टअप्स, एमएसएमई, तंत्रज्ञान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या भागातील पहिलीच अशी अत्याधुनिक भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली ही या शहरातील मुख्य वैशिष्ट्य असणार आहे. प्लग-अँड-प्ले मॉडेलवर आधारित ही प्रणाली डिस्ट्रिक्ट कूलिंग, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन, वीज, पाणी, वायू आणि टेलिकॉम यांसारख्या सर्व मूलभूत नागरी सुविधा एकत्रितपणे पुरवणात येणार आहे. खोदकामविरहित आणि भविष्यातील गरजांना अनुकूल असे शहर साकारले जाणार आहे.
झिरो माईल्सचा विकास
नागपूर शहराच्या आणि अखंड भारताच्या केंद्रस्थानी असलेले झिरो माईल स्टोन येथे सध्या पर्यटक येतात, म्हणून त्यांनी इथे थांबावे यासाठी या परिसराचा विकास होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येतं. त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या परिसरातील जागा राज्य शासनाच्या अखत्यारित असून येथे अखंड भारत कसा होता ? त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर केंद्रस्थानी कसे आले याबाबचा इतिहास दर्शविणारे एक्सपिरियन्स सेंटर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. एकूण 45 कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून संग्रहालय, आवश्यक सोयी सुविधा आणि वाहन तळ तयार करण्यात येईल, तसंच भविष्यात महानगरपालिकेमार्फत याची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.
ऑरेंज स्ट्रीटवर परफॉर्मन्स गॅलरी
नागपूर शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प इथे परफॉर्मन्स गॅलरी तयार करण्यात येणार आहे. इथे अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिली आहे. 20 हजार चौ.मीटरच्या या जागेत 6.2 लाख चौ.फुट जागेच्या विकासाला परवानगी मिळाली असून यातील 1.2 लाख चौ.फुट जागेत सभागृह बांधण्यात येणार आहे, तसंच उर्वरित जागेत इतर सोयी सुविधा तयार करण्यात येणार आहे.
मध्यवर्ती कारागृह शहराबाहेर जाणार
नागपूर शहराचे कारागृह कामठी तालुक्यातील बाबुलखेडाजवळ 81.6 एकर जागेत तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी पालघर, तळोदा आणि दिल्ली येथे बांधलेल्या कारागृहाच्या आर्किटेक्टशी सल्लामसलत करुन जेल मॅन्युअलनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
FAQ
1. नवीन नागपूर प्रकल्प म्हणजे काय?
नवीन नागपूर हा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) द्वारे संकल्पित अत्याधुनिक आणि तंत्रस्नेही शहराचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प हिंगणा तालुक्यातील गोधणी आणि लाडगाव येथे 1710 एकर (692 हेक्टर) क्षेत्रात विकसित होणार आहे. यात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र (IBFC) उभारले जाईल, जे स्टार्टअप्स, MSME, तंत्रज्ञान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.
2. नवीन नागपूर प्रकल्पाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली: डिस्ट्रिक्ट कूलिंग, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन, वीज, पाणी, वायू आणि टेलिकॉम सुविधा एकत्रितपणे पुरवणारी प्रणाली.
प्लग-अँड-प्ले मॉडेल: खोदकामविरहित आणि भविष्यातील गरजांना अनुकूल अशी रचना.
रोजगार संधी: आयटी, वित्त आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती.
एकात्मिक पायाभूत सुविधा: गुंतवणूक सुलभता आणि मजबूत प्रशासन मॉडेल.
हाय-कॅपॅसिटी रस्ते आणि हरित कॉरिडॉर: आधुनिक आणि पर्यावरणपूरक शहरी रचना.
3. नवीन नागपूर प्रकल्पाचा खर्च आणि निधी कसा उभारला जाणार आहे?
एकूण खर्च: 6,500 कोटी रुपये (3,000 कोटी जमीन अधिग्रहणासाठी, 3,500 कोटी पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी).
निधी: हुडको (HUDCO) कडून कर्ज, ज्याला राज्य शासनाची हमी आहे.
148 किमीच्या आऊटर रिंगरोडसाठी 4,800 कोटी रुपये हुडकोकडून मिळणार.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.