
BMC election : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे पक्षाने कंबर कसली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे. एकूण 21 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती
१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते
२) रामदास कदम, नेते
३) गजानन कीर्तीकर, नेते
४) आनंदराव अडसूळ, नेते
५) मीनाताई कांबळे, नेत्या
६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
७) रवींद्र वायकर, खासदार
८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार
९) राहुल शेवाळे, माजी खासदार
१०) संजय निरुपम, माजी खासदार
११) प्रकाश सुर्वे, आमदार
१२) अशोक पाटील, आमदार
१३) मुरजी पटेल, आमदार
१४) दिलीप लांडे, आमदार
१५) तुकाराम काते, आमदार
१६) मंगेश कुडाळकर, आमदार
१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार
१८) सदा सरवणकर, माजी आमदार
१९) यामिनी जाधव, माजी आमदार
२०) दीपक सावंत, माजी आमदार
२१) शिशिर शिंदे, माजी आमदार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून महायुतीत मतभेद
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून महायुतीत मतभेद असल्याचं समोर आले आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिलेत..तसेच स्थानिक स्तरावर स्वबळाबाबत एकमत झाल्यास तशा पद्धतीनं निवडणुका लढवू असं रत्नागिरीत बोलतांना प्रवीण दरेकर म्हणालेत. तर, प्रवीण दरेकरांच्या भूमिकेवर आता शिवसेने नेते उदय सामंत यांनी उत्तर दिले. महायुतीत निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत म्हणाले तसेच प्रवीण दरेकर समन्वय समितीत नाहीत त्यामुळे त्यांना माहिती नसते असा टोलाही त्यांनी लगावलाय..
मराठा आरक्षणच्या समितीध्ये मी होतो, ओबीसी समाज्याचे काही कमी होणार नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.