
Investment In Maharashtra: राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी एक लाख आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. याद्वारे राज्यामध्ये 47 हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार झाले.
शासन नेहमीच तत्पर
उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
गुंतवणुकीचा धडाका
अग्रवाल, इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कार्यकारी संचालक केतन मोदी, अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडचे अध्यक्ष अजित बरोदिया आणि पॉलिप्लेकस कॉपॅर्पोरशन लिमिटेडचे मुख्य कार्य अधिकारी प्रणय कोठारी यांच्यासमवेत करार झाले.
क्षेत्राशी संबंधित नोकऱ्या
याप्रसंगी मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन आदी उपस्थित होते. 34 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व 33 हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या 17 करारांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत 13 दिवसांपूर्वीच मुंबईत गुंतवणूक करार करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण क्षेत्राचा यात समावेश आहे. या क्षेत्राशी संबंधित नोकऱ्या राज्यात उपलब्ध होणार आहेत.
कोणकोणते करार झाले?
कोणकोणते सामंजस्य करार झाले :
> औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब उभारणीसाठी एमजीएसए रिअॅलिटी यांच्यावतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी ₹5000 कोटींची गुंतवणूक केली जात असून, यातून 10,000 रोजगार निर्मिती होईल.
> ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ‘ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क’ उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडकडून ₹30,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून, या डेटा सेंटर पार्कमुळे 6000 रोजगार निर्मिती होईल.
> नागपूर जिल्ह्यातील लिंगा कलमेश्वर या ठिकाणी एकात्मिक पृष्ठभाग कोळसा वायूकरण आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह प्रकल्प उभारणीसाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडकडून ₹70,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून, यातून 30,000 रोजगार निर्मिती होईल.
> नंदुरबार येथे पॉलिमेरिक उत्पादनांच्या प्रकल्पासाठी पॉलीप्लेक्स कार्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ₹2086 कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून, यातून 600 रोजगार निर्मिती होईल.
> काटोल, नागपूर येथे रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून खाद्य पेये आणि अन्न उत्पादनांच्या एकात्मिक सुविधा प्रकल्प निर्मितीसाठी ₹1513 कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून, याद्वारे 500 रोजगार निर्मिती होईल.
“उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्तीसाठी राज्य शासन नेहमीच तत्पर”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 11, 2025
FAQ
महाराष्ट्रात किती रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत?
राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्पांसाठी एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामुळे राज्यात 47 हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे.
हे करार कधी आणि कुठे झाले?
हे करार गुरुवारी (11 सप्टेंबर 2025) सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काय म्हटले?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.