
वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, गोंडेगाव येथे एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील चार वर्षांचा स्वराज अशोक खिल्लारे घराबाहेर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या सिमेंटच
.
नेमकी घटना काय?
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या नाल्यात पडून एका चार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वराज अशोक खिल्लारे (वय 4) असे मृत मुलाचे नाव असून, तो हिंगोली जिल्ह्यातील जामठी येथील रहिवासी होता. स्वराजची आई त्याला घेऊन वाशिम जिल्ह्यातील गोंडेगाव येथे माहेरी आली असताना हा अपघात घडला.
मृतदेह नाल्यात अडकलेल्या अवस्थेत आढळला
शनिवारी सकाळी स्वराज घराबाहेर खेळत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या सिमेंटच्या नाल्यात पडला. नाल्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने असल्यामुळे तो वाहून गेला. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याने कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. सुमारे एक तासानंतरही तो न सापडल्याने जेसीबीच्या मदतीने नालीचा काही भाग खोदण्यात आला. त्यावेळी स्वराजचा मृतदेह नाल्यात अडकलेल्या अवस्थेत आढळला.
जेव्हा स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तेव्हा त्याच्या आईने केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. एका क्षणात खेळता-बोलता मुलगा गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गोंडेगावमध्ये शोककळा पसरली असून, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.