
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ओबीसी उपसमितीच्या सदस्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत आतापर्यंत मराठा समाजाला जे कुणबी, मराठा कुणबी,कुणबी मराठा दाखले दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याबाबत समितीचे एकमत झाल्याची भूमिका मांडली आह
.
राज्याचे इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सरकारची श्वेतपत्रिकाबाबत काय भूमिका आहे हा प्रश्न उपस्थित केला आहे. उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. ज्येष्ठ मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ देखील या समितीत आहे. समितीमध्ये श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीबाबत एकमत झाले असेल तर याबाबत सरकारने कारवाई केली का? केली तर काय कारवाई केली? अशी विचारणा वडेट्टीवर यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.
तसेच विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून 2014 पासून तालुका पातळीवर, वर्ष निहाय मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
राज्यात आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली जात प्रमाणपत्रे यांची माहिती डिजिटल स्वरूपात देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी पत्रात केली आहे. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येणार आहे अस असताना आतापर्यंत किती प्रमाणपत्रांचे वाटप झाले? याची माहितीही काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे मागवली आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात मतचोरी
दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांनी एका ट्विटद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचा दाखला दिला आहे. ते म्हणाले, राहुल गांधीजींनी आज महाराष्ट्रामधील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात झालेल्या मतचोरीबाबत गंभीर खुलासे केले आहेत. कर्नाटकमध्ये नाव डिलिट करण्यात आली तर महाराष्ट्रात मतदार वाढवण्याचा प्रकार झाला.
चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघात 6,850 नावे वाढवण्यात आली. तर तशीच नावं वगळण्यात आली आहेत. हे जे मतदार वगळण्यात आले ते काँग्रेस सपोर्टर बूथ आहेत. मतचोरीचा हाच पॅटर्न कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि युपी मध्ये वापरण्यात आला आहे. मतचोरी हा लोकशाहीला धोका आहे. देशातील जनतेने आता याबाबत जागरूक झालं पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी या विरोधात आम्ही लढत राहू, असे ते म्हणालेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.